RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. त्यांना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. पण, मोहम्मद शमीनं टाकलेलं 17 वे षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरलं असं वाटलं, परंतु राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) ज्या पद्धतीनं खेळला त्याला तोडच नाही. राहुलच्या या फटकेबाजीनं RRला विजय मिळवून दिला. या विजयासह राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला.
RR vs KXIP Latest News & Live Score
Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!
जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी RRच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले. RR vs KXIP Latest News & Live Score
लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9व्या षटकात संपुष्टात आली. RRला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन उत्तुंग फटका मारला, तो जवळपास षटकारच होता, परंतु निकोलस पूरनने ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं, ते पाहून रितेश देशमुखही अवाक् झाला. त्यानं सोशल मीडियावर पूरनचे कौतुक केले.
सॅमसन एका बाजूनं तुफान फटकेबाजी करत होता. चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे KXIPलाही सॅमसनचा तडाखा बसत होता. पण, मोहम्मद शमीनं सामना फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं सॅमसनला माघारी पाठवले. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला. त्यानंतर RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवंर चार खणखणीत षटकार खेचून सामना 14 चेंडूंत 27 धावा असा चुरशीचा बनवला. राहुलनं 18व्या षटकात पाच षटकारांसह 30 धावा चोपल्या.
12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर RRला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला. राहुल टेवाटियानं 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. विजयासाठी अखेरच्या षटकात केवळ दोन धावा हव्या असताना शमीनं त्याला माघारी पाठवलं. रियान पराग ( Riyan Parag) दोन धावाही बनवू शकला नाही आणि त्रिफळाचीत होत माघारी परतला. सामना अधिक रोमहर्षक झाला. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.
या विजयासह राजस्थान रॉयल्सनं IPL इतिहासातिल सर्वाधिक धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा स्वतःचाच विक्रम मोडला. यापूर्वी त्यांनी 2008मध्ये डेक्कन चार्जर्सचे 215 धावांचे लक्ष्य पार केले होते.
किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे
IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो
IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video
मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम
रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video
KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा
Web Title: RR vs KXIP Latest News : Rajasthan Royals recorded the highest ever Run chase in IPL history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.