RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. त्यांना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. पण, मोहम्मद शमीनं टाकलेलं 17 वे षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरलं असं वाटलं, परंतु राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) ज्या पद्धतीनं खेळला त्याला तोडच नाही. राहुलच्या या फटकेबाजीनं RRला विजय मिळवून दिला. या विजयासह राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला.
RR vs KXIP Latest News & Live Score
जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी RRच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले. RR vs KXIP Latest News & Live Score
सॅमसन एका बाजूनं तुफान फटकेबाजी करत होता. चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे KXIPलाही सॅमसनचा तडाखा बसत होता. पण, मोहम्मद शमीनं सामना फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं सॅमसनला माघारी पाठवले. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला. त्यानंतर RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवंर चार खणखणीत षटकार खेचून सामना 14 चेंडूंत 27 धावा असा चुरशीचा बनवला. राहुलनं 18व्या षटकात पाच षटकारांसह 30 धावा चोपल्या.
12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर RRला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला. राहुल टेवाटियानं 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. विजयासाठी अखेरच्या षटकात केवळ दोन धावा हव्या असताना शमीनं त्याला माघारी पाठवलं. रियान पराग ( Riyan Parag) दोन धावाही बनवू शकला नाही आणि त्रिफळाचीत होत माघारी परतला. सामना अधिक रोमहर्षक झाला. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.
किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे
IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो
IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video
मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम