Join us  

RR vs KXIP Latest News : रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 8:26 PM

Open in App

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. RRकर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith)ने नाणेफेक जिंकून KXIPला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. RRने आजच्या संघात दोन बदल केले  आहेत. त्यांनी यशस्वी जैस्वाल ( Yashashwi Jaiswal) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) यांच्या जागी जोस बटलर ( Jose Buttler) आणि अंकित राजपूत ( Ankit Rajpoot) यांना संधी दिली. KXIPनं आजच्या सामन्यात कोणताच बदल केला नाही, त्यामुळे सलग तिसऱ्या सामन्यात ख्रिस गेलला ( Chris Gayle) अंतिम 11 खेळाडूंबाहेर ठेवण्यात आले. RR vs KXIP Latest News & Live Score

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video

लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 60 धावा चोपल्या. यंदाच्या IPL 2020मधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मयांकनं खणखणीत फटका मारला. तो जवळपास षटकारच होता, परंतु रियान परागनं अप्रतिमरित्या तो अडवला आणि KXIPला एका धावेवरच समाधान मानावे लागले. या दोघांनी 8 षटकांत 86 धावा चोपल्या. मयांकने खणखणीत षटकार खेचून 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार व 4 चौकारांचा समावेश आहे. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत बिनबाद 110 धावा चोपल्या. IPL2020मधील ही पहिली शतकी भागीदारी ठरली.

रियान परागची सुपर डाईव्ह

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स