RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. RRकर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith)ने नाणेफेक जिंकून KXIPला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. RRने आजच्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी यशस्वी जैस्वाल ( Yashashwi Jaiswal) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) यांच्या जागी जोस बटलर ( Jose Buttler) आणि अंकित राजपूत ( Ankit Rajpoot) यांना संधी दिली. KXIPनं आजच्या सामन्यात कोणताच बदल केला नाही, त्यामुळे सलग तिसऱ्या सामन्यात ख्रिस गेलला ( Chris Gayle) अंतिम 11 खेळाडूंबाहेर ठेवण्यात आले.
RR vs KXIP Latest News & Live Score
-
विजयासाठी अखेरच्या षटकात केवळ दोन धावा हव्या असताना शमीनं त्याला माघारी पाठवलं. रियान पराग ( Riyan Parag) दोन धावाही बनवू शकला नाही आणि त्रिफळाचीत होत माघारी परतला. सामना अधिक रोमहर्षक झाला. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला.
- 12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर RRला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला. राहुल टेवाटियानं 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. विजयासाठी अखेरच्या षटकात केवळ दोन धावा हव्या असताना शमीनं त्याला माघारी पाठवलं.
-सॅमसन एका बाजूनं तुफान फटकेबाजी करत होता. चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे KXIPलाही सॅमसनचा तडाखा बसत होता. पण, मोहम्मद शमीनं सामना फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं सॅमसनला माघारी पाठवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9व्या षटकात संपुष्टात आली. RRला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन उत्तुंग फटका मारला, तो जवळपास षटकारच होता, परंतु निकोलस पूरनने ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं, ते पाहून रितेश देशमुखही अवाक् झाला. त्यानं सोशल मीडियावर पूरनचे कौतुक केले.
- लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9व्या षटकात संपुष्टात आली. RRला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या.
- 15व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून मयांकनं IPLमधील पहिले शतक पूर्ण केले. 45 चेंडूंत त्यानं 98 चौकार व 7 षटकारांसह हे शतक पूर्ण केले. या खेळीसह मयांकनं 2010च्या मुरली विजयचा विक्रम मोडला. 17व्या षटकात टॉम कुरननं त्याला बाद केले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलही पुढच्या षटकात माघारी परतला. त्यानं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले.
मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम
मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत बिनबाद 110 धावा चोपल्या. IPL2020मधील ही पहिली शतकी भागीदारी ठरली.
सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मयांकनं खणखणीत फटका मारला. तो जवळपास षटकारच होता, परंतु रियान परागनं अप्रतिमरित्या तो अडवला आणि KXIPला एका धावेवरच समाधान मानावे लागले. या दोघांनी 8 षटकांत 86 धावा चोपल्या. मयांकने खणखणीत षटकार खेचून 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार व 4 चौकारांचा समावेश आहे.
- लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 60 धावा चोपल्या.
IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो
लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले.
IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video
- ख्रिस गेल आजही संघाबाहेर
- अंकित राजपूत व जोस बटलर IN; डेव्हिड मिलर व यशस्वी जैस्वाल OUT
-
-
KXIP vs RR Head To Headएकूण सामने - 19राजस्थान रॉयल्स - 10 विजयकिंग्स इलेव्हन पंजाब - 9 विजय
- जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थान रॉयल्सचा ( RR) संघ अधिक मजबूत झाला आहे.
- KXIPचा कर्णधार लोकेश राहुलने RRविरुद्ध ५५च्या सरासरीने एकूण २७५ धावा फटकावल्या आहेत. राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा राहुल तिसरा फलंदाज असून त्याच्यापुढे शॉन मार्श आणि मायकल हसी आहेत. या दोघांनी राजस्थानविरुद्ध अनक्रमे ४०९ आणि ३५० धावा फटकावल्या आहेत.