Join us  

RR Vs PBKS IPL LIVE: जयस्वाल-पड्‌डीकलची अर्धशतके; राजस्थानचा 4 विकेट राखून विजय; पंजाब IPL मधून बाहेर...

RR Vs PBKS IPL LIVE: पंजाब किंग्सने दिलेले 188 धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकात 4 गडी राखून पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:41 PM

Open in App

RR Vs PBKS IPL LIVE: आज इंडियन प्रीमियर लीग( IPL) मध्ये पंजाब किंग्ज (Punjan Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 66वा सामना धर्मशाला मैदाना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून पंजाबवर विजय मिळवला आहे. राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने RR ला 188 धावांचे तगडे आव्हान दिले होते. 

या विजयासह राजस्थानने आयपीएलमध्ये प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, तर पंजाब किंग्ज शर्यतीतून बाहेर पडला आहेत. धर्मशाला मैदानावर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या. राजस्थानने 188 धावांचे लक्ष्य 19.4 षटकात 6 गडी राखून पूर्ण केले.

राजस्थानकडून यशस्वी जसस्वाल आणि देवदत्त पड्डिकल यांनी अर्धशतकीय खेळी केली, तर शिमरॉन हेटमायरने 46 धावा काढल्या. या सामन्यात पुन्हा एकदा जॉस बटलर शून्यावर आउट झाला. यंदाच्या मोसमात चौथ्यांदा बटलर शून्यावर आउट झाला आहे. 

राजस्थानने इनिंगची सुरुवात चांगली केली, पण दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रबाडाने जोस बटलरला LBW केले. यानंतर 10व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर अर्शदीपने देवदत्त पदीकलला हरप्रीत ब्रारकडे झेलबाद केले. त्यानंतर 11व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर राहुल चहरने कर्णधार संजू सॅमसनला ऋषी धवनकडे झेलबाद केले. 15व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नॅथन एलिसने ऋषी धवनची विकेट घेतली. पाचवी विकेट 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडली. रबाडाने रियान परागला अथर्व तायडेकरवी झेलबाद केले. यानंतर 19व्या षटकातील 5व्या चेंडूवर सॅम करणने हेटमायरला धवनकडे झेलबाद केले.

RR Vs PBKS IPL LIVE: पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान

जैस्वालचे 35 चेंडूत अर्धशतक यशस्वी जैस्वालने यंदाच्या मोसमातील 5 वे अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जैस्वालचे हे आयपीएलमधील 50 वे अर्धशतक आहे. 12 धावांवर बटलरची विकेट गमावल्यानंतर यशस्वी जैस्वालने देवदत्त पदीकलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. सलामीवीर जोस बटलर शून्यावर बाद झाल्यानंतर खेळायला आलेल्या देवदत्त पडिकलने अर्धशतकी खेळी केली. त्याने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. देवदत्तचे हे मोसमातील दुसरे अर्धशतक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील 9वे अर्धशतक झळकावले आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स
Open in App