Join us  

RR Vs PBKS IPL LIVE: पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान

RR Vs PBKS IPL LIVE: अखेरच्या तीन ओव्हरमध्ये सॅम करन आणि शाहरुख खानने तुफानी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 9:29 PM

Open in App

RR Vs PBKS IPL LIVE: आज IPL 2023 मध्ये पंजाब किंग्ज (Punjan Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 66वा सामना धर्मशाला मैदानावर होत आहे. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने राजस्थानला 188 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने 5 विकेट गमावून 187 धावा केल्या.

जितेश शर्मा, सॅम करन आणि शाहरुख खान मुळे पंजाब किंग्स 187 धावांची मजल मारू शकला. पॉवरप्लेमध्ये 3 विकेट गमावल्यानंतर पंजाबकडून जितेश शर्माने 28 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली. यानंतर सॅम करनने 32 बॉलमध्ये 49 धावा केल्या. 1 रनाने त्याचे अर्धशतक हुकले. त्या पाठोपाठ शाहरुख खानने 23 बॉलमध्ये 41 धावांची जबरदस्त खेळी केली.

पंजाबची खराब सुरुवातफलंदाजीला उतरलेल्या पंजाबची अतिशय सूमार सुरुवात झाली. दुसऱ्याच बॉलवर पहिला झटका बसला. ट्रेंट बोल्टने प्रभसिमरन सिंगला (धावा 19) आउट केले. यानंतर शिखर धवन आणि अथर्व तायडेने पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला, पण पंजाबच्या नवदीन सैनीने तायडेला पड्डीकलच्या हाती झेलबाद केले. 

यानंतर अॅडम झम्पाने कर्णधार शिखर धवनला (17) माघारी पाठवलं. यानंतर लिअॅम निसॉनदेखील फक्त 9 धावा काढून नवदीन सैनीच्या बॉलवर आउट झाला. विकेटकिपर जितेश शर्माने संघाला सावरलं. त्याने 28 बॉलमध्ये 44 धावा केल्या. नवदीन सैनीने शर्माला डोनोमन फरेराच्या हाती थेलबाद केले. ही सैनीची तिसरी विकेट आहे. पण, शेवटी सॅम करन आणि शाहरुख खान या जोडीने राजस्तानच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. त्यांच्या तुफानी खेळीमुळे पंजाबने राजस्थानला 188 धावांचे आव्हान दिले. 

टॅग्स :आयपीएल २०२३पंजाब किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App