Join us  

RR Vs PBKS IPL LIVE : ट्रेंटने बोल्ट घेतला अफलातून झेल! हवेत घेतली झेप अन् पंजाबला दिला पहिला झटका

आज धर्मशालाच्या मैदानावर पंजाब आणि राजस्थानमध्ये 'करो या मरो'चा सामना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 7:45 PM

Open in App

RR Vs PBKS IPL LIVE: आज IPL 2023 मध्ये पंजाब किंग्ज (Punjan Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 66वा सामना धर्मशाला मैदानावर होत आहे. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्तानकडून पहिली ओव्हर ट्रेंट बोल्टने टाकली. यावेळी त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये पंजाबला पहिला झटका दिला.

पंजाबकडून कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरण सिंग सलामीला उतरले होते. पण, ट्रेंट बोल्डने दुसऱ्या बॉलवर प्रभसिमरन आउट केला. यावेळी ट्रेंट बोल्टने अतिशय चपळाईने झेल घेत प्रभसिमरणची कॅच घेतली. तो फक्त 2 धावा काढून पवेलियनमध्ये परतला. पहिली ओव्हर बोल्टने चांगली टाकली. त्याने पंजाबला फक्त दोन धावा दिल्या. सध्या क्रिजवर शिखर धवन आणि अथर्व तायडे खेळत आहेत.

रनरेट ठरवणार दोन्ही संघांनी 13 सामने खेळले असून, 12 गुण मिळवले आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोचा असणार आहे. पण, रनरेटच्या बाबतीत राजस्थान पंजाबपेक्षा वर आहे. पण, या दोन्ही संघांचे प्लेऑफचे गणित इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. तरीदेखील पंजाब आणि राजस्थान या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. 

टॅग्स :आयपीएल २०२३पंजाब किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App