Join us  

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या फायदा होईल असा निर्णय घेतला

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 7:08 PM

Open in App

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. आयपीएल २०२२च्या पर्वात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RR संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. पण, फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील RCBला दोनपैकी एकच सामना जिंकता आलेला आहे. मागील सामन्यात त्यांना कोलकाता नाईट रायडर्सचे १२९ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी घाम गाळावा लागला होता. दुसरीकडे RRने पाचवेळच्या मुंबई इंडियन्सला नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे आजची लढत हाय स्कोअरींग होईल यात शंका नाही.

राजस्थानचा जोस बटलर याने खणखणीत शतक झळकावून प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. संजू सॅमसनही चांगला फॉर्मात दिसतोय, परंतु तो मोठ्या खेळीच्या प्रयत्नात आहे. मुंबईचा इशान किशन हा सध्यातरी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे. बटरल व इशान यांच्या खात्यात समान १३५ धावा आहेत. विराट कोहलीने RRविरुद्ध मागील चार सामन्यांत १०६ च्या सरासरीने २१२ धावा केल्या आहेत, त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. या सामन्यात RCBचे माजी सहकारी समोरासमोर येणार आहेत. RCBचा यशस्वी गोलंदाज युझवेंद्र चहल यंदा राजस्थानकडून खेळतोय. 

कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय घेण्यापूर्वी तो हे विसरला की अपराजित राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत. त्यामुळे आज हा इतिहास बदलतो की राजस्थान विजयी हॅटट्रिक साधतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेर्फाने रुथरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप

राजस्थान रॉयल्सचा संघ - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा 

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएफ ड्यु प्लेसीस
Open in App