Join us  

Dinesh Karthik RR vs RCB, IPL 2022 Live Updates : दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळाले होते, परंतु...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 11:30 PM

Open in App

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळाले होते. पण, मॅच फिनिशर दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) आणि शाहबाज अहमद ( Shahbaz Ahmed) राजस्थान रॉयल्ससाठी कर्दनकाळ ठरले. या दोघांच्या तुफान फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. बिनबाद ५५ वरून ५ बाद ८७ अशी अवस्था झालेल्या RCBमध्ये नवचैतन्य संचारले. अहमद व कार्तिक या जोडीने ३३ चेंडूंत ६७ धावा चोपून RCBचा विजय निश्चित केला. 

जोस बटलर आणि शिमरोन हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा चोपून सामन्याचे चित्र बदलले. देवदत्त पडिक्कल, बटलर व हेटमायर यांनी खेळपट्टीवर जम बसवून नंतर फटकेबाजी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७० धावांचे लक्ष्य उभं करण्यात यश मिळवले. यशस्वी जैस्वाल ( ४) आणि कर्णधार संजू सॅमसन ( ८) हे वगळल्यास राजस्थानच्या तीनही फलंदाजांनी सुरेख खेळ केला. बटलर व पडिक्कल या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला.  बटलर व हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा कुटल्या. बटलर ४७ चेंडूंत ६ षटकारांसह ७०,तर हेटमायर ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने ३ बाद १६९ धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना फॅफ ड्यू प्लेसिस व अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून दमदार सुरूवात केली. पण, ७व्या षटकात युझवेंद्र चहलने RCBला पहिला धक्का दिला आणि फॅफ २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर नवदीप सैनीने पुढील षटकात अनुज रावतला ( २६) बाद केले. विराट कोहली व डेव्हिड विली यांच्या खांद्यावर मदार होती, परंतु दोघांमध्ये ताळमेळ चुकला. विराटला ( ५) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. अगदी काही इंचाच्या फरकामुळे विराटला बाद दिले गेले. पुढील चेंडूवर युझवेंद्रने विलीचा त्रिफळा उडवला आणि RCBची अवस्था बिनबाद ५५ वरून ५ बाद ८७ अशी झाली. ट्रेंट बोल्टने RCB च्या शेर्फाने रुथरफोर्डला बाद करून पाचवा धक्का दिला.

त्यानंतर मॅच फिनिशर दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) व शाहबाज अहमद मैदानावर आले. कार्तिकने दमदार फटकेबाजी करताना अहमदसह ३ षटकांत ४४ धावा कुटल्या व सामना पुन्हा RCBच्या बाजूने झुकवला. विराटच्या विकेटनंतर शांत झालेले वानखेडे स्टेडियमवर कार्तिकची फटकेबाजी पाहून पुन्हा उत्साहाने नाचू लागले. RRचे चाहते आता गप्प बसले. कार्तिक व अहमद यांनी २१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. युझीने १७व्या षटकात फक्त चार धावा दिल्या आणि त्याच्या ४ षटकांत १५ धावांत २ विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्टच्या १८व्या षटकात अहमदने दमदार फटके मारले आणि RRच्या हातून सामना पूर्णपणे खेचला. अहमद २६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावांवर बाद झाला. कार्तिकने नंतर RCBचा विजय पक्का केला. कार्तिक २३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४४ धावांवर नाबाद राहिला. RCBने हा सामना ४ विकेट्स व ५ चेंडू राखून जिंकला.

 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सदिनेश कार्तिक
Open in App