Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल ( ४) दुसऱ्याच षटकात त्रिफळाचीत झाला. डेव्हिड विलीने ही विकेट मिळवून दिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सामन्यावर पकड घेता आली असती. पण, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी जोस बटलर व देवदत्त पडिक्कल यांचे सोपे झेल सोडले. या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारीकरून राजस्थानला सावरले. हर्षल पटेलने ही जोडी तोडली, परंतु नाट्यमय घडामोडी घडल्या.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RR संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. पण, फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील RCBला दोनपैकी एकच सामना जिंकता आलेला आहे. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) संघासोबत असूनही अंतिम ११मध्ये त्याला खेळवण्यात न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार तो ५ एप्रिलपर्यंत आयपीएल सामना खेळू शकत नाही.
विलीने विकेट मिळवून दिल्यानंतर जोस बटलर व देवदत्तने हळुहळू धावांची गती वाढवली आणि संघाला सुस्थितीत आणले. १०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पडिक्कलने मारलेला चेंडू हवेत उंच झेपावला आणि विराटने सुरेखरित्या तो टिपला. देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला. देवदत्तने मैदान सोडल्यानंतर अम्पायरने त्याला माघारी बोलावले. मैदानावरील अम्पायर अनिल चौधरी यांच्या निर्णयाने विराट संतापला. विराटने टिपलेला चेंडू जमिनीवर टेकवल्याची शंका त्यांना वाटली. त्यामुळे तिसऱ्या अम्पायरला विचारण्यात आले. विराटला या निर्णयाचे आश्चर्य वाटले. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने त्याला सावरले. विराटने घेतलेली कॅच ही योग्य असल्याचा निर्णय दिला.
Web Title: RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli couldn’t believe when umpires told him they were checking the catch of Devdutta padikkal, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.