Join us  

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ६, ६, ६, ६, ६, ६!; Jos Buttler च्या नाबाद ७० धावांत फक्त Sixer च..., नोंदवला अजब विक्रम, Video

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : जोस बटलर आणि शिमरोन हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा चोपून सामन्याचे चित्र बदलले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 10:19 PM

Open in App

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : जोस बटलर आणि शिमरोन हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा चोपून सामन्याचे चित्र बदलले. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना सुरुवातीला खेळपट्टीवर धावा करताना चाचपडावे लागले. पण, देवदत्त पडिक्कल, बटलर व हेटमायर यांनी खेळपट्टीवर जम बसवून नंतर फटकेबाजी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७० धावांचे लक्ष्य उभं करण्यात यश मिळवले. या सामन्यात जोस बटलरने ( Jos Buttler) आगळावेगळा विक्रम केला.  

यशस्वी जैस्वाल ( ४) आणि कर्णधार संजू सॅमसन ( ८) हे वगळल्यास राजस्थानच्या तीनही फलंदाजांनी सुरेख खेळ केला. बटलर व पडिक्कल या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला.  बटलर व हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा कुटल्या. बटलर ४७ चेंडूंत ६ षटकारांसह ७०,तर हेटमायर ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने ३ बाद १६९ धावा केल्या. 

बटलरचे षटकारांचे शतक... बटलरने आयपीएलमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम या सामन्यात पूर्ण केला. आयपीएलमध्ये १००+ षटकार खेचणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये त्याने स्थान पटकावले. ख्रिस गेल ३५७ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २५१), किरॉन पोलार्ड ( २१५), डेव्हिड वॉर्नर ( २०१), शेन वॉटसन ( १९०), आंद्रे रसेल ( १५४), ब्रेंडन मॅक्यूलम ( १३०), ड्वेन स्मिथ ( ११७), ग्लेन मॅक्सवेल ( ११२) व फॅफ ड्यू प्लेसिस ( १०३) यांचा क्रमांक येतो.  

एकही चौकार न मारता नोंदवला विक्रम... आयपीएलमध्ये एका डावात एकही चौकार न मारून दमदार खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये बटलरने स्थान पटकावले. नितीश राणाने २०१७मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध ७ , संजू सॅमसनने २०१७मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध ७ व राहुल टेवतियाने २०२०मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध ७ षटकार खेचले होते. डेव्हिड वॉर्नर, आंद्रे रसेल यांनीही त्यांच्या खेळीत एकही चौकार न खेचता ६ षटकारांची आतषबाजी केली होती. बटलरने आज त्यांच्याशी बरोबरी केली.  

पण, पुरुषांच्या ट्वेंटी-२० सामन्यांत एका डावात एकही चौकार न मारून केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  याआधी एल्टन चिगुमबुराने झिम्बाब्वेच्या स्थानिक स्पर्धेत २०१०मध्ये ६५ धावा केल्या होत्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलररॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App