Why Glenn Maxwell not playing? RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ग्लेन मॅक्सवेलला RCBने आज का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय घेण्यापूर्वी तो हे विसरला की अपराजित राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:51 PM2022-04-05T19:51:51+5:302022-04-05T19:52:30+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Why Glenn Maxwell not playing today match against Rajasthan Royals?, know the reason  | Why Glenn Maxwell not playing? RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ग्लेन मॅक्सवेलला RCBने आज का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

Why Glenn Maxwell not playing? RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ग्लेन मॅक्सवेलला RCBने आज का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. आयपीएल २०२२च्या पर्वात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RR संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. पण, फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील RCBला दोनपैकी एकच सामना जिंकता आलेला आहे. 

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेर्फाने रुथरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप
  • राजस्थान रॉयल्सचा संघ - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा 

 

ग्लेन मॅक्सवेल का नाही खेळतोय?
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) RCBच्या डग आऊटमध्ये बसलेला पाहायला मिळाला. त्याचे नाव अंतिम ११ खेळाडूंमध्ये न दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु त्याच्या न खेळण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. मॅक्सवेलला १४.२५ कोटी रुपयांत RCBने ताफ्यात कायम राखले. 


ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूचे नुकतेच लग्न झाले आहे आणि तो पाकिस्तान दौऱ्यावर राष्ट्रीय संघाचा सदस्य नव्हता.  त्यामुळे तो १ एप्रिलला RCBच्या ताफ्यात दाखल झाला. तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून त्याने सहकाऱ्यांसोबत सरावही केला. पण, तो आजची मॅच खेळू शकत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार राष्ट्रीय संघ दौऱ्यावर असताना तो दौरा संपेपर्यंत करारबद्ध खेळाडू कोणत्याही लीगमध्ये खेळू शकत नाही. त्यामुळेच ५ एप्रिलपर्यंत ऑस्ट्रेलियाचे करारबद्ध खेळाडू IPL मध्ये खेळू शकणार नाहीत. मॅक्सवेलने मागील पर्वात ५१३ धावा केल्या होत्या.  

Web Title: RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Why Glenn Maxwell not playing today match against Rajasthan Royals?, know the reason 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.