RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : फॅफ ड्यू प्लेसिने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना निराश केले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलने अफलातून झेल घेऊन राजस्थान रॉयल्सला पहिले यश मिळवून दिले. ऑरेंज कॅप होल्डर विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर उभा राहिला आणि त्याने काही सुरेख फटकेही खेचले. पण, युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) त्याला फसव्या चेंडूवर चूक करण्यास भाग पाडले आणि RCB ला मोठा धक्का दिला.
RR नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB चे ओपरन विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सावध खेळ करण्याचा डाव आखला होता. त्यांनी संदीप शर्मा व आवेश खानला टार्गेट करून ४.४ षटकांत ३७ धावा फलकावर चढवल्या. बोल्टच्या तिसऱ्या षटकात फॅफने पूल शॉट खेचला, परंतु रोव्हमन पॉवेलने अविश्वसनीय झेल टीपला आणि फॅफ १७ धावांवर माघारी परतला. RCB ला ३७ धावांवर पहिला झटका बसला. पण, विराट मैदानावर उभा होता आणि त्याने २९वी धाव घेताच आयपीएल इतिहासात ८००० धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला. शिखर धवन हा ६७६९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. RCB ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५० धावा केल्या आणि बोल्टने पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ६ धावा देत १ विकेट मिळवली.
आठव्या षटकात संजू सॅमसनने गोलंदाजीला युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने मोठी विकेट मिळवून दिली. विराटने त्याचा चेंडू जोरदार टोलवला, परंतु बदली खेळाडू फेरेराने सीमारेषेवर सोपा झेल टीपला. विराट २४ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. १० षटकांत RCB ने २ बाद ७६ धावा केल्या. ११व्या षटकात रजत पाटीदारने ( ५) अश्विनच्या गोलंदाजीवर झेलची संधी दिली होती, परंतु ध्रुव जुरेलने सोपा झेल टाकला.
आयपीएल एलिमिनेटर्समध्ये विराटची कामगिरी
१२ वि. RR (2015)
६ वि. SRH (2020)
३९ वि. KKR (2021)
२५ वि. LSG (2022)
३३ वि. RR (2024)*
Web Title: RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Virat Kohli dismissed for 33 runs from 24 balls, Yuzvendra Chahal gets his wicket, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.