RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सनं धु धु धतले; राजस्थानच्या हातातून सामना आणला खेचून

एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 07:16 PM2020-10-17T19:16:00+5:302020-10-17T19:17:46+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB Latest News : Royal Challengers Bangalore won by 7 wickets, AB Devilliers hit 55 runs in 22 balls | RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सनं धु धु धतले; राजस्थानच्या हातातून सामना आणला खेचून

RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सनं धु धु धतले; राजस्थानच्या हातातून सामना आणला खेचून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) रॉबीन उथप्पाला सलामीला पाठवण्याचा डाव यशस्वी ठरला. उथप्पाला आज सूर गवसलेला दिसला, RRकर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकानं राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. विराट कोहली ( Virat Kohli) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) हे RCBला सहज विजय मिळवून देतील असे वाटले होते, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) सामना फिरवला. पडीक्कलच्या विकेटनंतर पुढच्याच चेंडूवर विराटचा अफलातून झेल घेत टेवाटियानं सामन्यात रंगत आणली. पण, एबी डिव्हिलियर्सनं ( AB deVilliers) वादळी खेळी करताना RCBला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे मात्र राजस्थानची पुढील वाटचाल अधिक खडतर केली आहे.

सलामीला आलेल्या रॉबीन उथप्पानं वॉशिंग्टन सूंदरनं टाकलेल्या चौथ्या षटकात चार चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ४५००+ धावा करणारा उथप्पा हा एकून ९वा आणि सहावा भारतीय खेळाडू ठरला. IPL 2020त प्रथम सलामीला आलेल्या उथप्पा पूर्वीच्या अंदाजात दिसला. त्यानं पदलालित्य दाखवत सुरेख फटके मारले. बेन स्टोक्स संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु ख्रिस मॉरिसनं टाकलेल्या सहाव्या षटकात स्टोक्स ( १५) बाद झाला. राहुल टेवाटिया 'कोरोना लस'ही बनवू शकतो; वीरेंद्र सेहवागनं का केला असा दावा?

विराट कोहलीनं ८वे षटक युजवेंद्र चहलच्या हाती सोपवलं. संजू सॅमसननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. पण, याच षटकाच्या चौथ्या व पाचव्या चेंडूवर चहलनं उथप्पा ( ४१) आणि सॅमसन ( ९) यांना बाद केले. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी ५८ धावांची भागीदारी करताना RRचा डाव सावरला. स्मिथ आणि राहुल टेवाटिया यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांचा पल्ला गाठून दिला. स्मिथ ३६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर माघारी परतला. टेवाटिया १९ धावांवर नाबाद राहिला.   ख्रिस मॉरिसनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या.


प्रत्युत्तरात आरोन फिंच ( १४) धावफलकारवर २३ धावा असताना श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर माघारी परतला. RRच्या गोलंदाजांनी RCBच्या धावगतीला लगाम लावला खरा, परंतु त्यांना विकेट घेण्यात अपयश आले. विराट कोहली आणि देवदत्ती पडीक्कल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RCBच्या डावाला आकार दिला. ही जोडी RCBला सहज विजय मिळवून देईल, असेच चित्र होते. पण, राहुल टेवाटियानं RRला यश मिळवून देताना पडीक्कलला ( ३५) बाद केले. पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कार्तिक त्यागीनं RCBचा कर्णधार विराटला बाद केले. राहुल टेवाटियानं सीमारेषेवर अफलातून झेल घेत RCBला दोन धक्के दिले. विराट ४३ धावांवर माघारी परतला. 

पण, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सचे वादळ घोंगावलं. जयदेव उनाडकटच्या षटकात त्यानं सलग तीन षटकार खेचले. १२ चेंडूंत विजयासाठई ३५ धावांची आवश्यकता असताना एबीनं १९व्या षटकात २५ धावा चोपून सामना RCBच्या बाजूनं झुकवला. त्यामुळे अखेरच्या षटकात RCBला विजयासाठी १० धावा हव्या होत्या आणि एबीनं त्या सहज करून दिल्या. RCBनं हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. एबीनं २२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ५५ धावा केल्या. गुरकिरत सिंग मनने नाबाद १९ धावा करून त्याला योग्य साथ दिली. 

Web Title: RR vs RCB Latest News : Royal Challengers Bangalore won by 7 wickets, AB Devilliers hit 55 runs in 22 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.