RR vs SRH Live match । हैदराबाद : आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील चौथा सामना खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणे आमच्यासाठी योग्यच असल्याचे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने म्हटले. एकूणच सॅमसनच्या म्हणण्यानुसार, राजस्थानला देखील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची होती. त्यामुळे भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन सॅमसनच्या देखीस मनासारखा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स आणि आदिल राशिद हे खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून पहिलाच सामना खेळत आहे. तसेच जेसन होल्डर आणि केएम आसिफ राजस्थान रॉयल्ससाठी पदार्पणाचा सामना खेळत आहेत.
नवीन संघातून पदार्पण करणारे खेळाडू -
- सनरायझर्स हैदराबाद - मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक.
- राजस्थान रॉयल्स - जेसन होल्डर आणि केएम आसिफ.
आजच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ -
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीकल, शेमरॉन हेटमायर, संजू सॅमसन, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, केएम आसिफ, ट्रेन्ट बोल्ट.
आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -
मयंक अग्रवाल, अभिषेक, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, आदिल राशिद, उमरान मलिक, फारूकी आणि नटराजन.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: RR vs SRH Live match Hyderabad captain Bhuvneshwar Kumar has won the toss and decided to bowl first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.