RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आखलेले सर्व डावपेच यशस्वी ठरले. ट्रेंट बोल्टने अपेक्षित सुरुवात करून देताना पहिल्याच स्पेलमध्ये ३ विकेट्स घेतल्या. राहुल त्रिपाठी आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघर्ष केला, परंतु सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज RR च्या जाळ्यात सहज अडकले. युझवेंद्र चहलची आज शॉर्ट थर्डवर कॅचिंग प्रॅक्टीस झाली. त्याने ३ झेल घेतले. आवेश खानने सलग दोन चेंडूंवर धक्के देऊन SRH च्या अडतणीत आणखी वाढ केली. हेनरिच क्लासेनच्या अर्धशतकी खेळीमुळे SRH ने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. RR च्या संदीप शर्मानेही २ विकेट्स घेऊन हातभार लावला.
RRने नाणेफेक जिंकून SRHला प्रथम फलंदाजीला बोलावले आणि ट्रेंट बोल्ट पुन्हा एकदा कर्णधाराच्या विश्वासावर खरा उतरला. बोल्टने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ३२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्मा ( १२) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. राहुल त्रिपाठीने SRH च्या धावांची गती वाढवली होती, परंतु बोल्टने त्यालाही चालते केले. राहुलने १५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. त्याच षटकात एडन मार्करम ( १) यालाही बोल्टने माघारी पाठवले. हैदराबादला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ६८ धावा करता आल्या. यंदाच्या पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १२ विकेट्स बोल्टने घेतल्या, तर आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ७१ विकेट्स घेतल्या आहेत आणि बोल्ट ( ६२) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१५ षटकांत SRH ने ६ बाद १३२ धावा केल्या. चहलने त्याच्या ४ षटकांत ३४ धावा दिल्या, परंतु त्याने महत्त्वाच्या ३ विकेट्स घेतल्या. क्लासेनने शेवटच्या षटकांत फटकेबाजी सुरू केली आणि ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच आर अश्विन ( ४३ धावा) महागडा ठरला. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने अप्रतिम यॉर्कवर क्लासेनचा ( ५०) त्रिफळा उडवला. क्लासेन व अहमदने २५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. बोल्टने ४-०-४५-३ अशी स्पेल टाकली. संदीपनेही ४-०-२५-२ असा मारा केला. आवेशने २०व्या षटकात ७ धावा दिल्या आणि हैदराबाद ९ बाद १७५ धावांपर्यंत पोहोचू शकले. शाहबाज १८ धावांवर झेलबाद झाला. आवेशने २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.