RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : सनरायझर्स हैदराबादने क्वालिफायर २ लढतीत पकड घेतली आहे. १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ त्यांनी ७९ धावांवर माघारी पाठवला. कर्णधार पॅट कमिन्सने शाहबाज अहमद, अभिषेक शर्मा व एडन मार्करम यांचा फिरकी मारा सुरू करून RR ची कोंडी केली. संघाचे हे पुनरागमन पाहून मालकिण काव्या मारन आनंदाने नाचताना दिसली.
SRH च्या वादळी फलंदाजांना रोखल्याचे श्रेय हे RR च्या गोलंदाजांना द्यायला हवे. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात ३ धक्के देऊन, त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आर अश्विन व युझवेंद्र चहल यांना फार प्रभाव पाडता आला नसला तरी आवेश खान ( ३-२७) व संदीप शर्मा ( २-२५) यांनी उत्तम मारा केला. SRH कडून राहुल त्रिपाठी ( ३७), ट्रॅव्हिस हेड ( ३४) यांनी सुरुवातीला संघर्ष करून संघाच्या धावांचा वेग १०च्या सरासरीने राखला होता. पण, RR च्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. हेनरिच क्लासेनने ३४ चेंडूंत ४ षटकारासह ५० धावा करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. क्लासेन व शाहबाद अहमद ( १८) यांनी २५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. हैदराबादला ९ बाद १७५ धावा करता आल्या.
SRH ने पहिल्या ८ षटकांमध्ये ११.५०च्या सरासरीने ३ बाद ९२ धावा केल्या. त्यानंतर ९ ते १४ षटकांत त्यांची ( ३-२८) सरासरी ४.६७ अशी राहिली आणि १५ ते २० षटकांत ९.१७च्या सरासरीने त्यांनी ३ बाद ५५ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल व टॉम कोह्लेर कॅडमोर यांनी सावध सुरुवात केली होती, परंतु पॅट कमिन्सने ही जोडी तोडली. कॅडमोर १० धावांवर झेलबाद झाला. तरीही RR ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या. चांगल्या फॉर्मात दिसलेल्या यशस्वीला ८व्या षटकात शाहबाज अहमदने माघारी पाठवले. यशस्वी २१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर झेलबाद झाला. अभिषेक शर्माला षटक देऊन पॅट कमिन्सने यशस्वी डाव टाकला आणि RR चा कर्णधार संजू सॅमसन ( १०) स्वस्तात बाद झाला. SRH साठी हा मोठी विकेट होती.
RR ला पहिल्या १० षटकांत ७३ धावा करता आल्या आणि पुढील १० षटकांत त्यांना १०३ धावा करायच्या होत्या. शाहबाजने त्याच्या षटकात रियान परागला उचकवले आणि पराग ६ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्याच षटकात आर अश्विन भोपळ्यावर माघारी परतल्याने, RR ची अवस्था ५ बाद ७९ अशी झाली.
Web Title: RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : Kavya Maran Celebrating and Dancing When Sanju Samson & Riyan Parag Out, Rajasthan Royals 79/5, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.