सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:16 PM2024-05-24T23:16:25+5:302024-05-24T23:18:24+5:30

whatsapp join usJoin us
RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : Sunrisers Hyderabad in IPL 2024 Final, match winning spell by  ABHISHEK SHARMA ( 2-24) & Shahbaz Ahmed ( 3-23), beat Rajasthan Royals | सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार

सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्सला त्यांनी क्वालिफायर २ मध्ये पराभूत केले. सहा वर्षांनी हैदराबाद IPL Final खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे ( KKR vs SRH Final ) आव्हान आहे. शाहबाज अहमद व अभिषेक शर्मा या फिरकी गोलंदाजांना SRH च्या विजयाचे श्रेय जाते. क्वालिफायर १ मध्ये KKR vs SRH खेळले होते आणि आता पुन्हा फायनलमध्ये हे दोन्ही संघ  भिडतील. 

आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 


यशस्वी जैस्वाल व टॉम कोह्लेर कॅडमोर ( १०) यांनी सावध सुरुवात केली होती, परंतु पॅट कमिन्सने ही जोडी तोडली. यशस्वी २१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर झेलबाद झाला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर कमिन्सने रणनीती बदलली. शाहबाज अहमदने यशस्वीला माघारी पाठवल्यानंतर अभिषेक शर्माने त्याच्या पहिल्या षटकात संजू सॅमसन ( १०) स्वस्तात बाद केले. त्यानंतर शाहबाजने एकाच षटकात दोन धक्के देताना रियान पराग ( ६) व आर अश्विन ( ०) यांना माघारी पाठवले. अभिषेकने अप्रतिम चेंडूवर शिमरोन हेटमायरचा ( ४) त्रिफळा उडवला आणि RR ला ९२ धावांवर सहावा धक्का दिला. शाहबाजने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर अभिषेकने ४-०-२४-२ अशी स्पेल टाकली.

Image
राजस्थानला शेवटच्या २४ चेंडूंत ६३ धावा हव्या होत्या. १८व्या षटकात टी नटराजनचा स्लोव्हर बाऊन्सर ध्रुव जुरेलच्या थेट मानेवर जाऊन आदळला. वेदनेने तो काहीकाळ कळवळला. नटराजनने संथ चेंडूवर रोव्हमन पॉवेलल ( ६) बाद करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. १२ चेंडू ५२ धावा असे अशक्य आव्हान राजस्थानसमोर होते आणि ध्रुव जुरेल हा एकमेव आशेचा किरण मैदानावर राहिला होता. ध्रुवने २६ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. ६ चेंडू ४२ धावा असा सामना आल्यावर काव्या मारनने विजयाचे सेलिब्रेशन सुरू केले. RR ला ७ बाद १३९ धावा करू शकला आणि हैदराबादने ३६ धावांनी सामना जिंकला. ध्रुव ५६ धावांवर नाबाद राहिला.


तत्पूर्वी, ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात ३ धक्के दिले. आवेश खान ( ३-२७) व संदीप शर्मा ( २-२५) यांनी उत्तम मारा केला. SRH कडून राहुल त्रिपाठी ( ३७), ट्रॅव्हिस हेड ( ३४) यांनी सुरुवातीला संघर्ष करून संघाच्या धावांचा वेग १०च्या सरासरीने राखला होता. हेनरिच क्लासेनने ३४ चेंडूंत ४ षटकारासह ५० धावा करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. क्लासेन व शाहबाद अहमद ( १८) यांनी २५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. हैदराबादला ९ बाद १७५ धावा करता आल्या.
 

 

Web Title: RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : Sunrisers Hyderabad in IPL 2024 Final, match winning spell by  ABHISHEK SHARMA ( 2-24) & Shahbaz Ahmed ( 3-23), beat Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.