RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्सला त्यांनी क्वालिफायर २ मध्ये पराभूत केले. सहा वर्षांनी हैदराबाद IPL Final खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे ( KKR vs SRH Final ) आव्हान आहे. शाहबाज अहमद व अभिषेक शर्मा या फिरकी गोलंदाजांना SRH च्या विजयाचे श्रेय जाते. क्वालिफायर १ मध्ये KKR vs SRH खेळले होते आणि आता पुन्हा फायनलमध्ये हे दोन्ही संघ भिडतील.
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video
यशस्वी जैस्वाल व टॉम कोह्लेर कॅडमोर ( १०) यांनी सावध सुरुवात केली होती, परंतु पॅट कमिन्सने ही जोडी तोडली. यशस्वी २१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर झेलबाद झाला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर कमिन्सने रणनीती बदलली. शाहबाज अहमदने यशस्वीला माघारी पाठवल्यानंतर अभिषेक शर्माने त्याच्या पहिल्या षटकात संजू सॅमसन ( १०) स्वस्तात बाद केले. त्यानंतर शाहबाजने एकाच षटकात दोन धक्के देताना रियान पराग ( ६) व आर अश्विन ( ०) यांना माघारी पाठवले. अभिषेकने अप्रतिम चेंडूवर शिमरोन हेटमायरचा ( ४) त्रिफळा उडवला आणि RR ला ९२ धावांवर सहावा धक्का दिला. शाहबाजने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर अभिषेकने ४-०-२४-२ अशी स्पेल टाकली.
तत्पूर्वी, ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात ३ धक्के दिले. आवेश खान ( ३-२७) व संदीप शर्मा ( २-२५) यांनी उत्तम मारा केला. SRH कडून राहुल त्रिपाठी ( ३७), ट्रॅव्हिस हेड ( ३४) यांनी सुरुवातीला संघर्ष करून संघाच्या धावांचा वेग १०च्या सरासरीने राखला होता. हेनरिच क्लासेनने ३४ चेंडूंत ४ षटकारासह ५० धावा करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. क्लासेन व शाहबाद अहमद ( १८) यांनी २५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. हैदराबादला ९ बाद १७५ धावा करता आल्या.