नवी दिल्ली : ‘मंकडिंग’च्या माध्यमातून गडी बाद करणे खेळभावनेला साजेसे नाही, असा सर्वसाधारण समज आहे. भारताचा आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने चेंडू टाकण्याआधी नॉनस्ट्रायकर फलंदाज क्रीज सोडत असेल, तर त्याला बाद करणे चुकीचे नाही, याचा पुनरुच्चार केला. अशावेळी गोलंदाजाला ‘फ्री बॉल’ची संधी मिळावी, अशी सूचनाही अश्विनने केली.
अश्विनने आयपीएलच्या मागच्या सत्रात किंग्स पंजाबविरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान जोस बटलरला ‘मंकडिंग’द्वारे बाद करताच खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित झाला होता. गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच जर फलंदाज क्रीजमधून बाहेर येत असेल तर हे खेळ भावनेला धरून आहे का, असा प्रश्न अश्विनने केला.
केकेआरचा खेळाडू दिनेश कार्तिकने ‘मंकडिंग रन आऊट’बाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. अश्विनने कार्तिकच्या वक्तव्याचे उत्तर दिले, ‘फलंदाज अशा चेंडूवर बाद होत असेल, तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाच धावा कमी व्हाव्या. गोलंदाजांसाठीही फ्री बॉलचा नियम लागू व्हावा. रोमांच वाढवण्यासाठी फ्री हिटचा नियम आहे.’ ‘मंकडिंगचा अर्थ नकारात्मक, गोलंदाजाची चूक नाहीच’१९४८ च्या आॅस्ट्रेलिया दौºयात महान अष्टपैलू विनू मंकड यांना बिल ब्राऊन याने धावबाद केल्यामुळे अशा प्रकारच्या बाद होण्यास ‘मंकडिंग’ असे नाव पडले. हा शब्द नकारात्मकरीत्या वापरला जात असला तरी फलंदाजाला बाद करण्यात कुठलीही चूक नाही. एका वेबसाईटला केकेआरचा खेळाडू दिनेश कार्तिक याने सांगितले की, ‘धावबाद करणाºया गोलंदाजाला नकारात्मक का समजता? या प्रकरणी विनू मंकड यांचे नाव नकारात्मकतेने घेतले जाते. त्यांना बाद करणारा ब्राऊन याचा सर्वांना विसर पडला.’