नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. अलीकडेच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत संघाचा सलामीवीर शुबमन गिलने शानदार खेळी केली होती. वन डे मध्ये द्विशतक झळकावल्यानंतर गिलने ट्वेंटी-20 मध्ये शतक ठोकून प्रसिद्धी मिळवली होती. खरं तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिल क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील चर्चेत असतो. मागील काही कालावधीपासून त्याचे नाव भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुलीशी जोडले जात आहे.
याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या त्याच्या अफेअरचीही बरीच चर्चा आहे. दरम्यान, शुबमन गिलने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कधी सारा तेंडुलकरसोबत तर कधी सारा अली खानसोबत त्याचे नाव जोडले जात आहे.
गिलने साजरा केला व्हॅलेटांईन डेदरम्यान, 14 फेब्रुवारीला म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे, शुबमन गिलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, "आज पुन्हा कोणता दिवस आहे?" खरं तर शुबमनने त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मुद्दाम ही गोष्ट लिहिली आहे जेणेकरून आजचा दिवस कोणता खास आहे हे सर्वांना कळावे. तर शुबमन गिलने पोस्ट केलेला आजचा फोटो 2021 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सारा तेंडुलकरने काढला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
शुबमनच्या फोटोमुळे चर्चांना उधाण
शुबमनने ज्या प्रकारे त्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला रिट्विट करत आणखी एका युजरने सारा तेंडुलकरचा फोटो पोस्ट केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे या फोटोंवरून अफेयरची चर्चा रंगली आहे. ट्विटरवरील फोटोनंतर काही चाहते म्हणत आहेत की, शुबमन गिल महान फलंदाज सचिनची मुलगी सारा तेंडुलकरसोबत कॉफी डेटवर गेला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"