जवळपास 8-9 महिन्यांनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या पर्वानंतर टीम इंडियाचे शिलेदार Mission Australiaसाठी सिडनीत दाखल झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे आता भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागत आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया चार कसोटी सामनेही खेळणार आहे. पण, या दौऱ्यावर भारतीय संघ वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत नव्या जर्सीत दिसणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वन डे मालिका सुरू होत आहे आणि त्यात दोन्ही संघ नव्या जर्सीत मैदानावर उतरलेले पाहायला मिळतील. टीम इंडियाची जर्सी थेट आपल्याला 90च्या दशतकात घेऊन जाईल.
4 ते 8 डिसेंबर या कालावधीत ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडिया रेट्रो जर्सीत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही जर्सी 1992च्या टीम इंडियाच्या जर्सीशी मिळतीजुळती असेल. भारतीय संघाच्या जर्सीसाठी MPL स्पोर्ट्स नवा स्पॉन्सर आहे. त्यानी NIKEला रिप्लेस केले. 120 कोटींची बोली लावून MPLने किट स्पॉन्सरशीप जिंकली.
टीम इंडियाप्रमाणे ऑस्ट्रेलियन टीमनेही नवी जर्सीचे अनावरण केले आहे.
वन डे मालिका ( भारतीय वेळेनुसार) ( India Tour of Australia Full Schedule 2020-21) २७ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २९ नोव्हेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून २ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - सकाळी ९.१० वाजल्यापासून
ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून
कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून