दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू व चेन्नईकडून खेळणारा अॅल्बी मॉर्केल हा एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. २०१२ मध्ये बेंगळूरविरुद्ध खेळताना मॉर्केलने ७ चेंडूत २८ धावा केल्या होत्या. त्याच्या स्ट्राईक रेट तब्बल ४०० ऐवढा होता.
दक्षिण आफ्रिकेचा आधारस्तंभ असलेला एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी करतो. सर्वाधिक स्ट्राईक रेटमधील यादीत डिव्हिलियर्स दुस-या स्थानावर आहेत. २०१२ मध्ये त्याने पुणे वॉरियर्सकडून खेळताना ८ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. तर यंदा २०१५ मध्ये मुंबईविरुद्ध खेळताना त्याने ११ चेंडूत ४१ धावा केल्या. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याचा स्टाईक रेट अनुक्रमे ३८७.५० व ३७२.७२ ऐवढा होता.
बलचंद्र अखिल हा गोलंदाज सर्वाधिक स्ट्राईक रेटच्या यादीत तिस-या स्थानावर आहे. अखिलने २०१३ मध्ये विरुद्ध खेळताना ३८५ च्या स्ट्राईक रेटने ७ चेंडूत २७ धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्जचा शिलेदार सुरेश रैनाने २०१४ मध्ये मुंबईविरुद्ध २५ चेंडूत ८७ धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट ३४८ ऐवढा होता.
यंदाच्या हंगामात फारशी चमकदार कामगिरी करु न शकलेला किरॉन पोलार्डने २०१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरोधात खेळताना १३ चेंडूत ४५ धावांची खेळी केली होती. त्याचा स्ट्राईक रेट ३४६.१५ होता.
ल्यूक राईट... इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ल्यूक राईटने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळताना १० चेंडूत ३२० च्या स्ट्राईक रेटने ३४ धावा केल्या होत्या.
अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेला युसूफ पठाण आयपीएलमध्ये त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. युसूफने २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना २२ चेंडूत ३२७.२७ च्या स्ट्राईक रेटने ७२ धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा सर्वाधिक षटकार असे असंख्य विक्रम स्वतःच्या नावावर करणारा ख्रिस गेल स्ट्राईक रेटच्या बाबतीत खालच्या स्थानावर आहे. गेलने २०११ मध्ये कोलकात्याविरोधात खेळताना १२ चेंडूत ३८ धावा ठोकल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट ३१६.६६ एवढा होता.
टी - २० सामने म्हणजे गोलंदाजांसाठी कर्दनकाळच.. आयपीएलमध्येही याचीच झलक पाहायला मिळत असून फलंदाजांच्या झंझावाताने गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले आहे. आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या टॉप ८ फलंदाजांचा घेतलेला हा आढावा