सुनील गावसकर लिहितात...विराट कोहलीने ज्या पद्धतीने आज आपल्या डावाची सुरुवात केली, त्यावरून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. न्यूलँड्स केपटाऊनच्या तुलनेत सेंच्युरियनमध्ये चेंडू अधिक स्विंग होत नसल्यामुळे त्याने खेळलेले आक्रमक व बचावात्मक फटके बघण्याचा आनंद औरच होता. खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरण्याचे संकेत मिळत असल्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेत यजमान संघावर दडपण आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही खेळपट्टी म्हणजे भारतीय खेळपट्टी आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही.खेळपट्टीवरून दक्षिण आफ्रिकेत चर्वितचर्वण सुरू आहे. भारतीय संघ मात्र हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज होता. त्यामुळे गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना रोखण्याची चांगली संधी असते. दरम्यान, टीम इंडियाला मात्र मायदेशातील खेळपट्टीप्रमाणे ही खेळपट्टी मिळाली आहे. आश्विनने शानदार मारा केला. त्याने गोलंदाजीत वैविध्याचा वापर करताना फलंदाजांना चकित करण्यासाठी ‘स्टॉक बॉल’चाही वापर केला. ईशांत शर्माची त्याला योग्य साथ लाभली. हार्दिक पंड्याने अमलाला केलेले धावबाद खºया अर्थाने ‘टर्निंग पॉइंट ठरले. अमला व कर्णधार ड्युप्लेसिस यांच्यादरम्यानच्या बहरत जाणाºया भागीदारीमुळे भारतीयांची धडधड वाढली होती, पण पंड्याने अमलाला धावचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. भारताला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रेरणादायी कृतीची गरज होती. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला ३०० धावांत रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झाला असेल, पण तरी ३३५ म्हणजे फार अधिक नाही. खेळपट्टी अद्याप फलंदाजीसाठी अनुकूल असून भारताने त्याचा लाभ घ्यायला हवा. न्यूलँड््सची खेळपट्टी वेगळी होती, पण येथील खेळपट्टी भारतासाठीच तयार करण्यात आल्याचे भासत आहे. त्यामुळे भारताने तिसºया दिवसअखेर सामन्यावर वर्चस्व मिळवावे, अशी आशा आहे. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अमलाचे धावबाद होणे ‘टर्निंग पॉइंट’
अमलाचे धावबाद होणे ‘टर्निंग पॉइंट’
विराट कोहलीने ज्या पद्धतीने आज आपल्या डावाची सुरुवात केली, त्यावरून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 6:04 AM