भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना पुण्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत. पण, एका श्रीलंकन खेळाडूला पुण्याच्या ट्राफिकचा भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. पुण्यात वाहतुक कोंडीची भयंकर समस्या आहे. पण, याच ट्राफीकमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अडकतो, तेव्हा त्याची पहिली रिअॅक्शन काय असेल, हे पाहायलाच हवी.
टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-20त श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले 143 धावांचे लक्ष्य 7 विकेट व 15 चेंडू राखून पार केले. टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आता मालिका विजयासाठी टीम इंडियाला, तर मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी श्रीलंकेला पुण्यात मेहनत घ्यावी लागणार आहे. पण, या सामन्यापूर्वी श्रीलंकनं खेळाडूच्या वाट्याला भयानक अनुभव आला.
या सामन्यासाठी खेळाडूंसह समालोचकही पुण्यात दाखल झाले आहेत. त्यापैकीच एक समालोचक आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू रसल अर्नोल्ड याला पुण्याच्या ट्राफिकचा फटका बसला आहे. विमानतळ ते हॉटेल असा प्रवास त्याला या ट्राफिकमधून करावा लागला. त्यानं या अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.