रसेलच्या कामगिरीमुळे केकेआरचे मनोधैर्य उंचावले

सुनील गावसकर लिहितात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 06:34 AM2019-04-07T06:34:39+5:302019-04-07T06:35:07+5:30

whatsapp join usJoin us
Russell's performance raised the morale of KKR | रसेलच्या कामगिरीमुळे केकेआरचे मनोधैर्य उंचावले

रसेलच्या कामगिरीमुळे केकेआरचे मनोधैर्य उंचावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीसाठी तयारी करताना आरसीबी संघ आंदे्र रसेलने केलेली धुलाई विसरलेले नसतील. त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे पाहुणा संघ स्वत:च्या चुका विसरून पराभवासाठी खेळपट्टीला दोष देत आहे. त्यांचे फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाल्यामुळे सनरायझर्सचा मार्ग सुकर झाला होता. सनरायझर्स संघ सध्या शानदार फॉर्मात आहे.


दिल्ली संघ आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी खेळपट्टीला दोष देत असल्यामुळे एक जुनी म्हण आठवते, ‘खराब शिल्पकार
आपल्या शस्त्रांना दोष देत असतो.’ त्यांच्या फलंदाजांनी बाद होण्यासाठी खेळलेल्या चुकीच्या फटक्यांची आठवण करायला हवी. त्याचप्रमाणे निम्मा हैदराबाद संघ तंबूत परतला असताना सुपर ओव्हरमध्ये आंद्रे रसेलविरुद्ध शानदार यॉर्करचा मारा करणाऱ्या कॅगिसो रबाडाने केलेल्या गोलंदाजीमुळे हैदराबाद संघाला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली.


शुक्रवारी लढत झालेली बेंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन होती. उभय संघांतील फलंदाजांनी त्याचा लाभ घेत सामन्यात ४०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या. खेळपट्टीमध्ये फार बदल होण्याची शक्यता नसून आरसीबी संघ कोहलीने नाणेफेक जिंंकून लक्ष्याचा पाठलाग करण्यास प्रयत्नशील राहील. कारण त्यांचे गोलंदाज मोठ्या लक्ष्याचाही बचाव करण्यास सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. गुड लेंथवरून चेंडूला उसळी मिळवण्यास सक्षम असलेल्या रबाडा व मॉरिसकडून संघाला चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
जयपूरमध्ये रॉयल्स संघासाठी सोपी लढत नसल्याचे स्पष्ट आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्सने रसेलच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यामुळे कोलकाता संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. पहिल्या सहा षटकांत राजस्थान संघाला सकारात्मक सुरुवातीची अपेक्षा आहे. स्मिथ व स्टोक्स यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी छाप सोडली तर राजस्थान संघाला मोठी धावसंख्या उभारता येईल.


केकेआर संघाबाबत काय बोलता येईल? पराभव स्वीकारणे त्यांना मान्य नाही. रसेलची कामगिरी उल्लेखनीय ठरत असून प्रत्येक खेळाडू आपल्या पद्धतीने संघाच्या यशात योगदान देत आहे. सुनील नारायणने यापूर्वीच्या मोसमाप्रमाणे बळी घेण्यास प्रारंभ केला तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली हा संघ अपराजित संघ म्हणून छाप पाडू शकतो.

Web Title: Russell's performance raised the morale of KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.