रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास

Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:37 PM2023-07-31T13:37:43+5:302023-07-31T13:38:11+5:30

whatsapp join usJoin us
Russi Cooper, world's oldest first class cricketer@100..passed away today morning at his residence in Colaba | रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास

रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी बॉम्बे व मिडलसेक्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९४४-४५ च्या रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यांनी होळकर्स संघाविरुद्ध ५२ व १०४ धावांची खेळी केली होती. मागच्या वर्षी त्यांनी वयाचे शतक पूर्ण केले होते. 


१९४३-४४ व १९४४-४५ या कालाधीत त्यांनी अनुक्रमे ७६.६० व ९१.८३ च्या सरासरीने धावा केल्या आणि ८ डावांमध्ये त्यांनी दोन शतकं व पाच अर्धशतकं झळकावली होती.  १९४९ पर्यंत त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाही, परंतु त्यानंतर मिडलसेक्स संघाकडून ८ सामने ते खेळले. १४ डिसेंबर १९२२ साली जन्मलेले कूपर हे मिडलसेक्स संघाकडून खेळणारे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. यापूर्वी हा विक्रम जेम्स गिलमन ( ९७ वर्ष व १८२ दिवस) यांच्या नावावर होता. १४ सप्टेंबर १९७६ मध्ये गिलमन यांचे निधन झाले.   


 

Web Title: Russi Cooper, world's oldest first class cricketer@100..passed away today morning at his residence in Colaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.