Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी बॉम्बे व मिडलसेक्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९४४-४५ च्या रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यांनी होळकर्स संघाविरुद्ध ५२ व १०४ धावांची खेळी केली होती. मागच्या वर्षी त्यांनी वयाचे शतक पूर्ण केले होते.
१९४३-४४ व १९४४-४५ या कालाधीत त्यांनी अनुक्रमे ७६.६० व ९१.८३ च्या सरासरीने धावा केल्या आणि ८ डावांमध्ये त्यांनी दोन शतकं व पाच अर्धशतकं झळकावली होती. १९४९ पर्यंत त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाही, परंतु त्यानंतर मिडलसेक्स संघाकडून ८ सामने ते खेळले. १४ डिसेंबर १९२२ साली जन्मलेले कूपर हे मिडलसेक्स संघाकडून खेळणारे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. यापूर्वी हा विक्रम जेम्स गिलमन ( ९७ वर्ष व १८२ दिवस) यांच्या नावावर होता. १४ सप्टेंबर १९७६ मध्ये गिलमन यांचे निधन झाले.