Ruturaj Gaikwad MS Dhoni, IPL 2022 CSK vs GT: गुजरात टायटन्सच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटकांत केवळ ५ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऋतुराज गायकवाडने डाव सावरण्यासाठी ४४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. जगदीशननेही ३९ धावांची नाबाद खेळी केली. पण कोणत्याही फलंदाजाने फटकेबाजी न केल्याने CSK ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद शमीने ४ षटकांत केवळ १९ धावा देत सर्वाधिक २ बळी टिपले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे ५ धावांत माघारी परतला. मोईन अलीने ऋतुराज गायकवाडला साथ दिली. पण दोन षटकार लगावल्यानंतर मोईन अली २१ धावांवर बाद झाला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने जगदीशनच्या साथीने चांगली भागीदारी केली. ऋतुराजने ४९ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तो बाद होताच शिवम दुबेही शून्यावर माघारी गेला. पाठोपाठ धोनीही ७ धावा काढून बाद झाला. जगदीशनने शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
गुजरात टायटन्स: वृद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, एन जगदीसन, एमएस धोनी, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथिराना, मुकेश चौधरी