Join us  

Ruturaj Gaikwad: मराठमोळा 'ऋतुराज गायकवाड' पुन्हा एकदा चमकला; वादळी शतक ठोकून महाराष्ट्राला सावरले

रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 5:26 PM

Open in App

नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात सामना खेळवला जात आहे. भारतीय संघातून वगळल्यानंतर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने आपला मोर्चा देशांतर्गत क्रिकेटकडे वळवला आहे. तामिळनाडूविरूद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकून ऋतुराजने महाराष्ट्राच्या संघाला सावरले. तत्पुर्वी, तामिळनाडूने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 

दरम्यान, महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सुरूवातीपासून शानदार खेळी केली, मात्र दुसरीकडे तामिळनाडूने महाराष्ट्राच्या कोणत्याच फलंदाजाला जास्त काळ टिकू दिले नाही. ऋतुराज गायकवाड 126 चेंडूत 118 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. मात्र, केदार जाधव (56) आणि अंकित बावणे (45) धावा करून तंबूत परतले, तर अजीम काझी नाबाद (87) धावा करून आपल्या सलामीवीराची साथ देत आहे. खरं तर ऋतुराजने 3 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने पहिल्या दिवशी सामन्यात पकड बनवली. 

ऋतुराजने महाराष्ट्राला सावरले ऋतुराज गायकवाडच्या वादळी खेळीला रोखण्यात कोणत्याच तामिळनाडूच्या गोलंदाजाला यश आले नाही. ऋतुराज पहिल्या दिवसाअखेर खेळपट्टीवर टिकून राहिला आणि 350 एवढ्या धावांचा डोंगर उभारला. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या दिवसाअखेर 83 षटकांत 6 बाद 350 धावा केल्या आहेत. तामिळनाडूकडून लक्ष्मीनारायण विघ्नेशने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर संदीप वारियर, रविश्रीनिवासन साई किशोर आणि विजय शंकर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :रणजी करंडकमहाराष्ट्रऋतुराज गायकवाडभारतीय क्रिकेट संघ
Open in App