Ruturaj Gaikwad ruled out of the SAvIND Test series (Marathi News) - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराज गायकवाडच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला उर्वरित दौऱ्यातून माघार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या दुखापतीच्या पुढील व्यवस्थापनासाठी तो NCAमध्ये दाखल होणार आहे. ऋतुराजच्या जागी निवड समितीने अभिमन्यू ईश्वरनची ( Abhimanyu Easwaran ) निवड केली आहे.
वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे . निवड समितीने रजत पाटीदार, सर्फराज खान, आवेश खान आणि रिंकू सिंग यांचा भारत अ संघात समावेश केला आहे. कुलदीप यादवला रिलीज केले गेले आहे. अभिमन्यूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २२ शतकं व २६ अर्धशतकांसह ६५६७ धावा केल्या आहेत.
भारत अ संघ - अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, नवदीप सैनी, आकाश दीप, विद्वथ कवेरप्पा, मानव सुथार, रिंकू सिंग ( India A’s updated squad for four-day match against SA A: Abhimanyu Easwaran (C), Sai Sudharsan, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Tilak Varma, Dhruv Jurel (wk), Axar Patel, Washington Sundar, Avesh Khan, Navdeep Saini, Akash Deep, Vidhwath Kaverappa, Manav Suthar, Rinku Singh