महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत दुसऱ्या शतकाची नोंद केली. १२ ऑक्टोबरला ऋतुराजने सर्व्हिस संघाविरुद्ध शतक झळकावले होते आणि आज त्याने संजू सॅमसनच्या केरळ संघाची धुलाई केली. त्याने ६८ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ११४ धावा कुटल्या आणि महाराष्ट्राला ४ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली. या शतकासह ऋतुराजने एक वेगळाच विक्रम नावावर केला, जो रोहित शर्मा व विराट कोहली यांनाही जमलेला नाही.
सौरव गांगुलीचा 'डबल' गेम झाला! BCCI चं अध्यक्षपद गेलं अन् जय शाह अँड टीमने आणखी एक धक्का दिला
सर्व्हिसविरुद्धच्या सामन्यात त्याने ६५ चेंडूंत ११२ धावा केल्या होत्या. त्यात १२ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. आज त्याने पी शाह सह ( ३१) पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. राहुल त्रिपाठी ( ०) व ए काझी ( १४) हे अपयशी ठरले. पण, ऋतुराजने किल्ला लढवला. त्याने केरळच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ११४ धावांवर तो झेलबाद झाला आणि महाराष्ट्राला ४ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत एकपेक्षा अधिक शतकं मारणाऱ्या फलंदाजांमध्ये ऋतुराजने नाव कोरले.
भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदच्या नावावर ३ शतकं आहेत. करुण नायर , इशान किशन, मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज यांच्या नावावर प्रत्येकी २ शतकं आहेत. महाराष्ट्राच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना केरळने १७ षटकांत ९९ धावांत ८ विकेट्स गमावल्या आहेत. रोहन कुन्नुम्मलने ५८ धावा केल्या. संजू सॅमसन ३ धावांवर बाद झाला. एस बच्चावने ३, तर ए काझीने २ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"