Join us  

Ruturaj Gaikwad ने मन जिंकले! द्विशतक झळकावले, सलग ७ षटकार खेचले; 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना सहकाऱ्याला बोलावले

Ruturaj Gaikwad - महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने सोमवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:09 AM

Open in App

Ruturaj Gaikwad - महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने सोमवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत वादळी खेळी केली. त्याने सलग सात षटकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना ऋतुराज एका षटकात ६,६,६,६,६nb,६,६ असे सात षटकार खेचणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.  महाराष्ट्राच्या कर्णधाराने १५९ चेंडूंत २२० धावांची दमदार खेळी करताना १० चौकार व १६ षटकार खेचले आणि संघाला ५ बाद ३३० धावांचा पल्ला गाठून दिला. एका षटकात सर्वाधिक ८ षटकारांचा विक्रम न्यूझीलंडचा माजी खेळाडू ली जर्मन याच्या नावावर आहे. १९८९-९०च्या प्रथम श्रेणी सामन्यात जर्मनने त्या षटकात ७७ धावा चोपल्या होत्या आणि १७ नो बॉल पडले होते.  

ऋतुराजने त्या षटकात ४३ धावा चोपल्या आणि लिस्ट एक क्रिकेटमध्ये नॉर्थन डिस्ट्रीक्टच्या ब्रेट हॅम्प्टन आणि जोए कार्टर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक षटकात सहा षटकार केवळ चारच फलंदाजांना करता आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स, भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आणि अमेरिकेचा जस्करन मल्होत्रा यांनी हा पराक्रम केला आहे. 

महाराष्ट्राच्या ३३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा संघ २७२ धावांत तंबूत परतला. आर्यन जुयालने १५९ धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगर्गेकरने ५३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर जेव्हा ऋतुराजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला तेव्हा त्याने राजवर्धनलाही बोलावले आणि त्याच्यासोबत हा पुरस्कार शेअर केला.

ऋतुराज गायकवाड लिस्ट ए मधील कामगिरी

६९ सामने

३७५८ धावा

२२०* सर्वोत्तम धावा

५८.७१ सरासरी  

१३ शतकं

१६ अर्धशतकं 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ऋतुराज गायकवाडविजय हजारे करंडक
Open in App