सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत ऋतुराज 'फास्टेस्ट' ;आयपीएलच्या 14 सामन्यांतच 5 पुरस्कार 

शॉन मार्शने आयपीएलच्या 10 सामन्यांतच 5 सामनावीर पुरस्कार जिंकलेले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:32 PM2021-09-20T13:32:01+5:302021-09-20T17:20:56+5:30

whatsapp join usJoin us
(Ruturaj Gaykawad Fastest in terms of Man of the Match awards; 5 awards in 10 IPL matches | सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत ऋतुराज 'फास्टेस्ट' ;आयपीएलच्या 14 सामन्यांतच 5 पुरस्कार 

सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत ऋतुराज 'फास्टेस्ट' ;आयपीएलच्या 14 सामन्यांतच 5 पुरस्कार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-ललित झांबरे

आयपीएलच्या (IPL 2021) रविवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI)  20 धावांनी विजय मिळवला. 3 षटकाअखेर 3 बाद 7 अशा अवस्थेतून सीएसकेने हा सामना जिंकला ह्याचे कारण सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaykawad) 58 धावांतील नाबाद 88 धावांची खेळी. या खेळीमुळेच सीएसकेला 6 बाद 156 अशा विजयी धावसंख्येपर्यंत मजल मारता आली आणि ऋतुराज सामनावीर ठरला. 

आयपीएलमध्ये ऋतुराज सामनावीर ठरण्याची ही पाचवी वेळ. आणि तो सामने खेळलाय फक्त 14..म्हणजे 14 सामन्यात आयपीएलचे 5 वेळा सामनावीर पुरस्कार ह्यासह तो भारतीय क्रिकेटपटूंमध्ये फास्टेस्ट आहे आणि आयपीएल खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये तो 'सेकंड फास्टेस्ट' आहे. केवळ एकटा शॉन मार्श हाच त्याच्या पुढे आहे आणि शॉन मार्शने आयपीएलच्या 10 सामन्यांतच 5 सामनावीर पुरस्कार जिंकलेले आहेत. 

आयपीएलमध्ये 5 सामनावीर पुरस्कारांसाठी कमीत कमी सामने

10- शाॕन मार्श
14 - ऋतुराज गायकवाड
18 - युसुफ पठाण
23 - ख्रिस गेल
23 - राशिद खान
25 - सचिन तेंडूलकर

आणखी एक विशेष बाब म्हणजे सुपरकिंग्जचे युएईमध्ये जे शेवटचे चार सामने झाले आहेत त्या चारही सामन्यात सामनाविराचा पुरस्कार जिंकलेला आहे. 

ऋतुराजचे आयपीएल सामनावीर पुरस्कार

विरुध्द मुंबई इंडियन्स- दुबई - 2021 - 88 धावा
विरुध्द सनरायझर्स - दिल्ली - 2021 - 75 धावा
विरुध्द किंग्ज इलेव्हन, अबुधाबी- 2020 - 62 धावा
विरुध्द नाईट रायडर्स, दुबई- 2020 - 75 धावा
विरुध्द राॕयल चॕलेंजर्स, दुबई- 2020 -65 धावा

Web Title: (Ruturaj Gaykawad Fastest in terms of Man of the Match awards; 5 awards in 10 IPL matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.