-ललित झांबरे
आयपीएलच्या (IPL 2021) रविवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) 20 धावांनी विजय मिळवला. 3 षटकाअखेर 3 बाद 7 अशा अवस्थेतून सीएसकेने हा सामना जिंकला ह्याचे कारण सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaykawad) 58 धावांतील नाबाद 88 धावांची खेळी. या खेळीमुळेच सीएसकेला 6 बाद 156 अशा विजयी धावसंख्येपर्यंत मजल मारता आली आणि ऋतुराज सामनावीर ठरला.
आयपीएलमध्ये ऋतुराज सामनावीर ठरण्याची ही पाचवी वेळ. आणि तो सामने खेळलाय फक्त 14..म्हणजे 14 सामन्यात आयपीएलचे 5 वेळा सामनावीर पुरस्कार ह्यासह तो भारतीय क्रिकेटपटूंमध्ये फास्टेस्ट आहे आणि आयपीएल खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये तो 'सेकंड फास्टेस्ट' आहे. केवळ एकटा शॉन मार्श हाच त्याच्या पुढे आहे आणि शॉन मार्शने आयपीएलच्या 10 सामन्यांतच 5 सामनावीर पुरस्कार जिंकलेले आहेत.
आयपीएलमध्ये 5 सामनावीर पुरस्कारांसाठी कमीत कमी सामने
10- शाॕन मार्श14 - ऋतुराज गायकवाड18 - युसुफ पठाण23 - ख्रिस गेल23 - राशिद खान25 - सचिन तेंडूलकर
आणखी एक विशेष बाब म्हणजे सुपरकिंग्जचे युएईमध्ये जे शेवटचे चार सामने झाले आहेत त्या चारही सामन्यात सामनाविराचा पुरस्कार जिंकलेला आहे.
ऋतुराजचे आयपीएल सामनावीर पुरस्कार
विरुध्द मुंबई इंडियन्स- दुबई - 2021 - 88 धावाविरुध्द सनरायझर्स - दिल्ली - 2021 - 75 धावाविरुध्द किंग्ज इलेव्हन, अबुधाबी- 2020 - 62 धावाविरुध्द नाईट रायडर्स, दुबई- 2020 - 75 धावाविरुध्द राॕयल चॕलेंजर्स, दुबई- 2020 -65 धावा