विराट कोहलीचा विक्रम मोडताच नेदरलँड्सच्या फलंदाजानं मागितली माफी

ध्यानी मनी नसताना अचानक एखादी खेळी अपरिचीत खेळाडूला थेट दिग्गजांच्या पंक्तीत बसवते तेव्हा त्या खेळाडूची कशी तारांबळ उडते याचा प्रत्येय आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 11:56 AM2019-10-05T11:56:51+5:302019-10-05T11:57:13+5:30

whatsapp join usJoin us
Ryan ten Doeschate issues apology after upstaging Virat Kohli, Babar Azam to achieve unique milestone | विराट कोहलीचा विक्रम मोडताच नेदरलँड्सच्या फलंदाजानं मागितली माफी

विराट कोहलीचा विक्रम मोडताच नेदरलँड्सच्या फलंदाजानं मागितली माफी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ध्यानी मनी नसताना अचानक एखादी खेळी अपरिचीत खेळाडूला थेट दिग्गजांच्या पंक्तीत बसवते तेव्हा त्या खेळाडूची कशी तारांबळ उडते याचा प्रत्येय आला आहे. नेदरलँड्सचा क्रिकेटपटू रायन टेन डोएचॅटला हा अनुभव आला. त्यानं सध्याच्या घडीतील आघाडीचे फलंदाज विराट कोहली आणि बाबर आझम यांचा अद्वितीय विक्रम मोडला आहे. याची कल्पना डोएचॅटलाही नव्हती आणि जेव्हा हे कळलं तेव्हा त्यानं कोहली व आझम या दोघांची माफी मागितली. 

नेदरलँड्सच्या या फलंदाजाने वन डे क्रिकेटमध्ये 67च्या सरासरीनं 1541 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर कोहली व आझमचा नंबर येतो. आता हा विक्रम काय आहे ते आधी जाणून घेऊया... वन डे क्रिकेटमध्ये किमान 1000 धावा करताना सर्वाधिक सरासरींत नेदरलँड्सच्या खेळाडूनं बाजी मारली आहे. कोहलीनं 60.31च्या सरासरीनं 11520,तर आझमनं 54.55च्या सरासरीनं 3328 धावा केल्या आहेत. या विक्रमाची सोशल मीडियावर हवा झाल्याचं समजताच डोएचॅटनं कोहली व आझमची माफी मागितली. 


डोएच‌ॅटनं 13 ट्वेंटी-20 सामन्यांत 42.85 च्या सरासरीनं 300 धावा केल्या आहेत. प्रथण श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 188 सामन्यांत 10766 धावा आहेत. त्यात 29 शतकं व 49 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 55 व 13 विकेट्सही आहेत. 

Web Title: Ryan ten Doeschate issues apology after upstaging Virat Kohli, Babar Azam to achieve unique milestone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.