ध्यानी मनी नसताना अचानक एखादी खेळी अपरिचीत खेळाडूला थेट दिग्गजांच्या पंक्तीत बसवते तेव्हा त्या खेळाडूची कशी तारांबळ उडते याचा प्रत्येय आला आहे. नेदरलँड्सचा क्रिकेटपटू रायन टेन डोएचॅटला हा अनुभव आला. त्यानं सध्याच्या घडीतील आघाडीचे फलंदाज विराट कोहली आणि बाबर आझम यांचा अद्वितीय विक्रम मोडला आहे. याची कल्पना डोएचॅटलाही नव्हती आणि जेव्हा हे कळलं तेव्हा त्यानं कोहली व आझम या दोघांची माफी मागितली.
नेदरलँड्सच्या या फलंदाजाने वन डे क्रिकेटमध्ये 67च्या सरासरीनं 1541 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर कोहली व आझमचा नंबर येतो. आता हा विक्रम काय आहे ते आधी जाणून घेऊया... वन डे क्रिकेटमध्ये किमान 1000 धावा करताना सर्वाधिक सरासरींत नेदरलँड्सच्या खेळाडूनं बाजी मारली आहे. कोहलीनं 60.31च्या सरासरीनं 11520,तर आझमनं 54.55च्या सरासरीनं 3328 धावा केल्या आहेत. या विक्रमाची सोशल मीडियावर हवा झाल्याचं समजताच डोएचॅटनं कोहली व आझमची माफी मागितली.