Join us

S Shreesanth : 9 वर्षांच्या बंदीनंतर मैदानावर परतला अन् पहिली विकेट घेताच खेळपट्टीला नमस्कार केला, Video

Ranji Trophy: विकेट घेतल्यानंतर एस श्रीसंत खूप भावूक झालेला दिसला. याचा एक व्हिडिओही त्याने शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:50 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस श्रीसंतने(S Sreesanth) अनेक वर्षांच्या बंदीनंतर मैदानात पुनरागमन केले आहे. तो सध्या केरळकडून रणजी ट्रॉफी (Ranji Trophy)मध्ये खेळत आहे. दरम्यान, 9 वर्षानंतर विकटे मिळवल्यावर श्रीसंत भावूक झाला. स्वतः श्रीसंतने सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रीसंतने विकेट घेतल्यानंतर मैदानाला नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.

व्हिडिओ शेअर करत श्रीसंत म्हणाला, 'देवाच्या कृपेने 9 वर्षांनंतर ही माझी पहिली विकेट आहे. मी खूप आनंदी होतो आणि विकेट घेतल्यानंतर खेळपट्टीला प्रमाण केला.' मेघालय विरुद्धच्या सामन्यात श्रीसंतला 9 वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विकेट घेण्यात यश आले आहे. श्रीसंतने फलंदाज आर्यन बोराला बाउंसर टाकून बाद केले. या सामन्यात श्रीसंतने 12 षटकात 40 धावा देऊन 2 बळी घेतले, मात्र दुसऱ्या डावात त्याला विकेट घेता आली नाही. 

श्रीसंतची गोलंदाजी पाहून चाहतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. 2013 मध्ये श्रीसंतवर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. नंतर 2020 मध्ये त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली, त्याच वर्षी तो क्रिकेटमध्ये परतला. त्याने आयपीएल लिलावातही आपले नाव दिले, पण कोणत्याही फ्रँचायझीने त्याला विकत घेतले नाही. परंतु आता रणजी ट्रॉफीमध्ये गोलंदाजी करून श्रीसंतने दाखवून दिले आहे की, त्याच्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. 

टॅग्स :श्रीसंतऑफ द फिल्ड
Open in App