Join us  

एस. श्रीसंतला पुन्हा एकदा केरळच्या उच्च न्यायालयाचा दणका, आजीवन क्रिकेटबंदी ठेवली कायम

क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला पुन्हा एकदा केरळच्या उच्च न्यायालयानं दणका दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 8:44 PM

Open in App

नवी दिल्ली- क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला पुन्हा एकदा केरळच्या उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. बीसीसीआयने श्रीसंतवर घातलेली आजीवन क्रिकेटबंदी केरळ उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीसंतनं खेळावरील घातलेली बंदी उठवण्यासंदर्भातील केलेलं अपील बीसीसीआयनं फेटाळून लावलं होतं. बीसीसीआय कोणताही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असं पत्र लिहून श्रीसंतला कळवलं होतं. श्रीसंतनं 2013च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लावलेले प्रतिबंध हटवण्यासाठी प्रशासक समिती(सीओए)कडेही अपील केलं होतं. त्यानंतर बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी श्रीसंतला पत्र लिहून बंदी हटवणार नसल्याचं सांगितलं होतं.ते म्हणाले होते, बीसीसीआयनं सूचित केल्याप्रमाणे श्रीसंतवर आजीवन बंदी कायम राहील आणि त्याला प्रतिस्पर्धी संघात खेळण्यासाठी स्वीकृती नसेल. त्यानं केरळच्या स्थानिक न्यायालयातही बंदी हटवण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती, त्यालाही आमच्या वकिलांनी उत्तर दिलंय. 

बीसीसीआयनं भ्रष्टाचारविरोधात शून्य सहिष्णुतेची नीती वापरली आहे. कोणत्याही न्यायालयानं श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त केलेलं नाही. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कनिष्ठ न्यायालयानं फेटाळून लावला होता. ब्रिटनच्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी श्रीसंत प्रयत्नशील असून, त्यासाठी बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसआयनं त्याच्यावरील बंदी उठवण्यास नकार दिला होता.

टॅग्स :क्रिकेटबीसीसीआयन्यायालय