वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने (S Sreesanth) बुधवारी सर्व प्रकारच्या स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. श्रीसंत नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळताना दिसला होता. या सत्रातील रणजी ट्रॉफीच्या लीग राउंडनंतर श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात वेगवान गोलंदाज श्रीसंत मेघालयविरुद्ध खेळताना दिसला होता. मेघालयविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 2 बळी घेतले. मात्र, दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळाला नाही. महत्वाचे म्हणजे श्रीसंतची कारकिर्द वादांनीही भरलेला होती.
निवृत्तीची घोषणा करताना श्रीसंतने ट्विट केले की, 'पुढच्या पीढीतील क्रिकेटर्ससाठी.. मी आपली प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्द थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा आहे, आणि खरेतर मला माहीत आहे की, यामुळे मला आनंद मिळणार नाही, मात्र माझ्या आयुष्यात हा निर्णय यावेळी घेणे योग्य आणि सन्मानाचे आहे. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.'