त्रिवेंद्रम : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि ‘केरळ एक्स्प्रेस’ या नाव्याने ख्याती असलेला एस. श्रीसंत याने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिलेल्या श्रीसंतने नुकतेच आयपीएलच्या महालिलावासाठी स्वत:ला उपलब्ध ठेवले होते.
लिलावात एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. अखेर त्याने क्रिकेटला अलविदा केले. श्रीसंतने सोशल मीडियावर अतिशय भावनिक पोस्टही लिहिली आहे. क्रिकेटपासून दूर असलेल्या श्रीसंतने अनेकदा सोशल मीडियावर आपले मत मांडले होते. आयुष्यातील चढउतार ते क्रिकेटधील पुनरागमनापर्यंत त्याने सर्व बाबींना उजाळा दिला होता.
ट्विटरवर श्रीसंतने लिहिले, ‘माझे कुटुंबीय, सहकारी व चाहत्यांचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी कुठलीही खंत न बाळगता सांगू इच्छितो की मी सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर करीत आहे.’
श्रीसंतची कारकिर्द
श्रीसंतने भारताकडून २७ कसोटी सामन्यांतून ८७ बळी घेत तीन वेळा ५ बळी घेण्याची कामगिरी केली. त्याने ५३ एकदिवसीय सामने खेळताना ७५ बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ५५ धावांत ६ बळी घेत सर्वोत्तम मारा केला. १० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत श्रीसंतने ७ बळी घेतले. २००७ साली टी-२० विश्वविजेतेपदात श्रीसंतने प्रभावी मारा केला होता.
Web Title: S. Sreesanth retires from all forms of cricket; The decision was taken after being dropped from the IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.