2013च्या या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सच्या एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलं होतं. त्यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) बंदी घातली होती. आता श्रीसंतवरील बंदी संपणार असून पुढील महिन्यात तो केरळच्या रंणजी संघातून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. पण, श्रीसंतवर राजस्थान रॉयल्सच्या माजी खेळाडूनं आणि 2012साली भारतीला 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूनं गंभीर आरोप केले आहेत.
Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी
हरमीत सिंगनं क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला. तो राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता आणि त्यावेळी श्रीसंत आणि त्याची चांगली गट्टी जमली होती. श्रीसंतची खोली ही त्याच्या खोली शेजारीच असायची. हरमीतने सांगितले की,''श्रीसंत रात्रभर पार्टी करायचा आणि त्याच्या खोलीत मुली असायच्या. त्यावेळी संघात राहुल द्रविड आणि श्रीसंत हे कसोटी खेळणारे दोनच खेळाडू होते आणि ते दोघंही मला मार्गदर्शन करायचे. श्रीसंत आणि माझी खोली शेजारीच असायची.''
2013मध्ये जेव्हा श्रीसंतला अटक करण्यात आली तेव्हा CCTV फुटेज व्हायरल झालं होतं. त्यात श्रीसंतच्या खोलीत महिला जाताना दिसत होती. हरमीतनं या मुद्द्यावर मोठा खुलासा केला. तो म्हणाला,''श्रीसंतच्या खोलीतून कोण येतं, कोण जातं याच्याशी मला काहीच देणंघेणं नव्हतं. मी सकाळी 6-7 वाजता जेव्हा जीममध्ये जाण्यासाठी निघायचो, तेव्हा श्रीसंत पार्टी करत असायचा. त्याच्यासोबत जनार्दन नावाचा व्यक्तीही असायचा आणि त्याला अटक करण्यात आली होती. श्रीसंतनं तो त्याचा भाऊ असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळे मला सुरुवातीला शंका आली नाही. त्यांच्यासोबत मुलीही असायच्या. श्रीसंत दिसायलाही स्मार्ट होता आणि जयपूरमध्येही त्याच्यासोबत मुली असायच्या.''
हरमीतनं हेही सांगितले की, श्रीसंतच्या पार्टीचं बिल 2-3 लाखांपर्यंत यायचं.
दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाचा पराक्रम; इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!
आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!