Join us  

SAT20 League : २२ वर्षीय खेळाडूसाठी Mumbai Indians अन् काव्या मारन यांच्यात टक्कर; SRHची मालकिण ठरली वरचढ, Video 

 SA20 Auction, SA T20 Costliest Players LIST: दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या ट्वेंटी-२० लीगसाठी सोमवारी लिलाव पार पडला. ऑक्शनच्या वेळी सर्वांच्या चर्चेची विषय राहिली ती SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran)...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 4:08 PM

Open in App

 SA20 Auction, SA T20 Costliest Players LIST: दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या ट्वेंटी-२० लीगसाठी सोमवारी लिलाव पार पडला. ऑक्शनच्या वेळी सर्वांच्या चर्चेची विषय राहिली ती SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran)... तिने Mumbai Indiansला २२ वर्षीय खेळाडूसाठी SA20 Auction मध्ये कडवी टक्कर दिली. MI च्या 'स्टार' युवा खेळाडूसाठी काव्या मारनने फ्रँचायझीच्या खात्यातील जवळपास २६ टक्के रक्कम खर्ची घातली आणि SAT20 League Auction मधील सर्वात महागडा खेळाडू बनवला..पहिल्या वहिल्या दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगसाठी पार पडलेल्या ऑक्शनमध्ये ३१४ खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आणि मोजकेच खेळाडू कोट्याधीश झाले.

मुंबई इंडिन्स फ्रँचायझीच्या  MI Cape Town आणि सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या SunRisers Eastern Cape यांच्यातल्या चुरशीने २२ वर्षीय खेळाडूचे नशीब चमकवले. २२ वर्षीय त्रिस्तान स्टब्स ( Tristan Stubbs) हा दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. MI Cape Town आणि चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीच्या JoBurg Super Kings यांनी स्टब्ससाठी जोरदार बोली लावली, परंतु ७ मिलियन पर्यंत आकडा गेल्यानंतर सुपर किंग्सने माघार घेतली आणि इस्टर्न केपची एन्ट्री झाली. काव्या मारनने स्तब्ससाठी फ्रँचायझीच्या खात्यातील २६ टक्के रक्कम खर्ची घातली व R ९.२ मिलियन म्हणजेच भारतीय रकमेत ४.१ कोटींत युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले.  

कोण आहे त्रिस्तन स्टब्स दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-२० संघातील उगवता तारा असे स्टब्सला म्हटले जाते. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेंटी-२० चॅलेंज स्पर्धेत त्याने ७ सामन्यांत २९३ धावा केल्या. आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ताफ्यात घेतले. त्या ने मोजक्याच सामन्यात आपला दम दाखवला  नुकतंच त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहाव्या क्रमांकावर येताना २८ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या.   

सनरायझर्स इस्टर्न केप ( SunRisers Eastern Cape Squad ) - त्रिस्तान  स्टुब्स, सॅरेल एर्वी, जॉर्डन कॉक्स ( इंग्लंड), अॅडम रॉसिंग्टन ( इंग्लंड), मार्कस एकर्मन, एडन मार्कराम, मार्को येनसन, सिसांडा मगाला, ब्रेडन कार्स ( इंग्लंड), जेजे स्मट्स, टॉम एबेल ( इंग्लंड),  आया जीकमेन, रोऑफ व्ह‌ॅन डेर मर्वे, जेम्स फुलर ( इंग्लंड), मेसन क्रेन ( इंग्लंड), जुनैद दावूद, ओटनेल बार्टमन 

मुंबई इंडियन्स केप टाऊन ( MI Cape Town Squad) - रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रियान रिकल्टन, ग्रांट रोएलोफ्सेन, वेबली मार्शल, ओडीन स्मिथ ( वेस्ट इंडिज), जॉर्ज लिंडे, ड्युआन येनसन, डेलानो पोत्गिटर, राशिद खान ( अफगाणिस्तान), लिएम लिव्हिंगस्टोन ( इंग्लंड), सॅम कुरन ( इंग्लंड), बेयूरान हेंड्रीक्स, ओली स्टोन ( इंग्लंड), वकार सलामखेइल ( अफगाणिस्तान), जियाद अब्राहम्स, कागिसो रबाडा  

दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील महागडे खेळाडू ( SA 20 League Auction: COSTLIEST BUYS) - 

  • त्रिस्तान स्टब्स ( ४.१ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप)
  • रिली रोसोवू ( २.७९ कोटी, प्रेटोरिया कॅपिटल्स)
  • मार्को येनसन ( २.७४ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप)
  • वेन पार्नेल ( २.५२ कोटी, प्रेटोरिया कॅपिटल्स)
  • डोनाव्होन फेरेरा ( २.४७ कोटी, जोहान्सबर्ग सुपर किंग्स)
  • सिसांडा मगाला ( २.४३ कोटी, सनरायझर्स इस्टर्न केप)
  • हेनरिच क्लासेन ( २.०२ कोटी, डर्बन्स सुपर जायंट्स)
  • रिझा हेंड्रीक्स ( २.०२ कोटी, जोहान्सबर्ग सुपर किंग्स)
  • तब्रेझ शम्सी ( १.९३ कोटी, पार्ल रॉयल्स)
  • ड्वेन प्रेटोरियस ( १.९० कोटी, डर्बन्स सुपर जायंट्स)   
टॅग्स :द. आफ्रिकामुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App