मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर यांचा चौकार-षटकारांचा पाऊस; आफ्रिकेसमोर ३९३ धावांचे लक्ष्य 

७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७  सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 08:15 PM2023-09-09T20:15:50+5:302023-09-09T20:16:53+5:30

whatsapp join usJoin us
SA vs AUS : Dropped from the World Cup squad, Marnus Labuschagne scored 124 runs & David Warner (106), South Africa need 393 runs to win Australia  | मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर यांचा चौकार-षटकारांचा पाऊस; आफ्रिकेसमोर ३९३ धावांचे लक्ष्य 

Australia's 8-392 is the second highest ODI total ever posted at Bloemfontein's Mangaung Oval

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) यांनी शतक झळकावताना दक्षिण आफ्रिकेसमोर तगडे लक्ष्य उभे केले. ७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७  सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला... आज त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली आणि शतक झळकावले. 


डेव्हिड वॉर्नर आणि आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने ११.५ षटकांत १०९ धावा फलकावर चढवल्या. हेड ३६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६४ धावांवर माघारी परतला. वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने ९३ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. वन डेतील हे त्याचे २०वे शतक ठरले. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ओपनर म्हणून हे त्याचे ४६वे शतक ठरले. वॉर्नर माघारी परतल्यानंतर लाबुशेनच्या फटकेबाजीने आफ्रिकेच्या गोलंदाजांचे टेंशन वाढवले.  


लाबुशेन ९९ चेंडूंत १९ चौकार व १ षटकारासह १२४ धावांवर बाद झाला. त्याला साथ देणाऱ्या जोश इंग्लिसने ३७ चेंडूंत ५० धावा कुटल्या. ४५.१ षटकांत लाबुशेनची विकेट पडली तेव्हा ऑसींच्या ३५८ धावा झाल्या होत्या आणि त्यांच्या तळाचे फलंदाज झटपट माघारी परतले. ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३९२ धावा उभ्या केल्या.     

 

Web Title: SA vs AUS : Dropped from the World Cup squad, Marnus Labuschagne scored 124 runs & David Warner (106), South Africa need 393 runs to win Australia 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.