SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) यांनी शतक झळकावताना दक्षिण आफ्रिकेसमोर तगडे लक्ष्य उभे केले. ७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७ सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला... आज त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली आणि शतक झळकावले.
डेव्हिड वॉर्नर आणि आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने ११.५ षटकांत १०९ धावा फलकावर चढवल्या. हेड ३६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६४ धावांवर माघारी परतला. वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने ९३ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. वन डेतील हे त्याचे २०वे शतक ठरले. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ओपनर म्हणून हे त्याचे ४६वे शतक ठरले. वॉर्नर माघारी परतल्यानंतर लाबुशेनच्या फटकेबाजीने आफ्रिकेच्या गोलंदाजांचे टेंशन वाढवले.