SA vs PAK 1st Test : आफ्रिकेची 'स्टेन'गन धडाडली, शॉन पोलॉकचा विक्रम मोडला

दुखापतीमुळे आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनने जोरदार पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:51 PM2018-12-26T14:51:34+5:302018-12-26T14:52:00+5:30

whatsapp join usJoin us
SA vs PAK 1st Test: South Africa DALE STEYN paceman becomes his country's most successful Test bowler. | SA vs PAK 1st Test : आफ्रिकेची 'स्टेन'गन धडाडली, शॉन पोलॉकचा विक्रम मोडला

SA vs PAK 1st Test : आफ्रिकेची 'स्टेन'गन धडाडली, शॉन पोलॉकचा विक्रम मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : दुखापतीमुळे आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनने जोरदार पुनरागमन केले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फखर झमानची विकेट घेताच स्टेनने विक्रम नावावर केला. कसोटी कारकिर्दीतले त्याचा हा 422 वा बळी ठरला आणि यासह आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याने पटकावला. त्याने शॉन पोलॉकचा विक्रम मोडला. 35 वर्षीय स्टेनने हा पल्ला गाठण्यासाठी 89 सामने खेळले. पोलॉकने 108 कसोटी सामन्यांत 421 विकेट घेतल्या. 


स्टेनने जुलै 2015 मध्ये 400 वा बळी टिपला होता त्यानंतर पुढील 22 विकेटसाठी त्याला तीन वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. त्याने सर्वात जलद 400 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. या क्रमवारीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 72 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचे सर रिचर्ड हॅडली आणि स्टेन यांनी 80 व्या सामन्यात हा पराक्रम केला. 

स्टेनचे आणखी काही विक्रम
एका डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये स्टेन अव्वल स्थानावर आहे. त्याने 26 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. अॅलन डोनाल्डने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम 20 वेळा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक पाच वेळा कसोटीत दहा विकेट घेण्याचा विक्रमही स्टेनच्या नावावर आहे. कागिसो रबाडाने चार वेळा ही कामगिरी केली आहे
सेंच्युरियन स्टेडियमवर त्याने सर्वाधिक 56 विकेट घेतल्या आहेत. मकाया एनटीनीने या स्टेडियमवर 54 विकेट घेतल्या आहेत. 
 

 

Web Title: SA vs PAK 1st Test: South Africa DALE STEYN paceman becomes his country's most successful Test bowler.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.