SA vs PAK : इथं विराट ३३ धावांवर बाद झाला अन् तिथं बाबर आजमनं इतिहास रचला; शतकी खेळीत १९ चेंडूंत ८४ धावा कुटल्या

पाकिस्ताननं २ षटकं हातची ठेऊन हा विजय मिळवला. यापूर्वी २००७मध्ये आफ्रिकेनं वेस्ट इंडिजविरुद्ध २००+ लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. पाकिस्ताननं भारताचा विक्रम मोडला. भारतानं २०१९मध्ये १.२ षटकं हातची ठेऊन वेस्ट इंडिजविरुद्ध २००+ धावांचे लक्ष्य पार केले होत. Babar Azam SA vs PAK T20I

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:48 PM2021-04-14T21:48:12+5:302021-04-14T21:50:55+5:30

whatsapp join usJoin us
SA vs PAK : Pakistan is the first team to chase 200+ in T20Is with only one wicket down, Babar Azam score 122 runs in 59 ball | SA vs PAK : इथं विराट ३३ धावांवर बाद झाला अन् तिथं बाबर आजमनं इतिहास रचला; शतकी खेळीत १९ चेंडूंत ८४ धावा कुटल्या

SA vs PAK : इथं विराट ३३ धावांवर बाद झाला अन् तिथं बाबर आजमनं इतिहास रचला; शतकी खेळीत १९ चेंडूंत ८४ धावा कुटल्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SA vs PAK, 3rd T20I : आयसीसीच्या जागतिक वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झालेल्या बाबर आजमनं ( Babar Azam) बुधवारी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अविस्मरणीय खेळी केली. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानसमोर ५ बाद २०३ धावांचे लक्ष्य उभं केलं. पण, आयसीसीकडून मिळालेल्या गिफ्टमुळे बाबर सुसाट सुटला अन् त्यानं आफ्रिकनं गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर याची टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी सातत्यानं तुलना होत आली. पण, आजच्या दिवसात या दोन खेळाडूंच्या खेळीची तुलना करायची झाल्या, विराट आयपीएलमध्ये ३३ धावांवर माघारी परतला, तर बाबरनं अविस्मरणीय शतक झळकावलं.


२०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर अन् मोहम्मद रिझवान यांनी वादळी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७.४ षटकांत १९७ धावांची विक्रमी भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीची ही चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. पाकिस्तानकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रिझवाननं ४७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. बाबरनं ५९ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १२२ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. पाकिस्ताननं १८ षटकांत १ बाद २०५ धावा करून विजय मिळवला. २००+ लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त एक विकेट गमावून विजय मिळवणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला. 


दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पाकिस्तानची वाट लावली, ७ वर्षांत अशी धुलाई कुणी केलीच नाही
 दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना धु धु धुतलं... मागील ७ वर्षांत पाकिस्तानची अशी अवस्था कोणत्याच संघानं केली नव्हती आणि ती आज आफ्रिकेनं करून दाखवली. प्रथम फलंदाजी करताना जॅनेमन मलान, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व जॉर्ज लिंडे यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर हात साफ केले. ७ वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०त २००+ धावा करणारा आफ्रिका हा पहिलाच संघ ठरला. आफ्रिकेनं २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या. याआधी २०१३मध्ये डिसेंबरमध्ये श्रीलंकेनं २००+ धावा केल्या होत्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मलान व मार्कराम यांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. मलान ४० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर, तर मार्कराम ३१ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांवर माघारी परतला. ही दोघं माघारी परतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजा कमबॅक करतील असे वाटत होते, परंतु लिंडे व ड्यूसेन यांनी हात साफ केले. लिंडेनं ११ चेंडूंत २२, तर ड्युसेननं २० चेंडूंत ३४ धावा कुटल्या. 

Web Title: SA vs PAK : Pakistan is the first team to chase 200+ in T20Is with only one wicket down, Babar Azam score 122 runs in 59 ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.