SA20 : दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगला कालपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI CapeTown संघाने बोनस गुणासह विजय मिळवला. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या Paarl Royals संघावर त्यांनी ८ विकेट्स व २७ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) व जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) चमकले. IPL मध्ये ब्रेव्हिसची फटकेबाजी पाहून सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर प्रभावित झाली होती. तिने वानखेडेच्या स्टेडियमवर उपस्थित राहताना ब्रेव्हिसच्या खेळीचे कौतुक केलेले २०२२ मध्ये सर्वांनी पाहिले. त्याच ब्रेव्हिसने SA20 मध्ये धडाकेबाज खेळी केली.
सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले. अंदाजे ५३९ दिवसांनंतर आर्चर वेगवान गोलंदाजी करताना दिसला. त्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवली. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर आर्चरने चार षटकांच्या स्पेलमध्ये एक निर्धाव षटकासह तीन बळी घेतले आणि २२ धावा दिल्या. आर्चरने त्याचा शेवटचा सामना २० जुलै २०२१ मध्ये इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट संघासाठी खेळला होता. त्यानंतर आर्चरला आधी कोपराचा त्रास झाला आणि नंतर पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाला. यामुळेच तो बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता.
आर्चरने मुंबई केप टाऊनसाठी पहिला सामना खेळताना पार्ल रॉयल्सविरुद्ध तीन विकेट घेतल्या. त्यामुळे रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून केवळ १४२ धावा करू शकला. जोस बटलर ( ५१) व कर्णधार डेव्हिड मिलर ( ४२) यांनी चांगला खेळ केला. आर्चरने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विहान लुब्बेला पायचीत केले. यानंतर आर्चरने डेव्हिड मिलर आणि फेरीस्को अॅडम्सचे विकेटही घेतली. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या ४१ चेंडूंत ४ चौकार व ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ७० धावांच्या जोरावर मुंबई केप टाऊनने विजय मिळवला. रियान रिकेल्टनने ३३ चेंडूंत ४२ धावांची खेळी केली. मुंबईने हे लक्ष्य १५.३ षटकांत पार केल्याने त्यांना एक बोनस गुणही मिळाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"