अहमदाबाद - सकाळपासूनच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याचा फिव्हर वाढत असून चाहत्यांची चांगलीच क्रेझ अहमदाबादच्या मैदानाबाहेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाल सपोर्ट देण्यसाठी, चिअरअप करण्यासाठी भारतीय चाहते मोठ्या संख्येने मैदानाबाहेर जमले असून भारतीय तिरंगा ध्वज सर्वत्र पाहायला मिळत आहे. अहमदाबाद मैदानावर सेलिब्रिटींचीही जोरदार एंट्री पाहायला मिळाली. विराट पत्नी अनुष्का शर्माही मैदानावर दाखल झाली आहे. तर भारतरत्न सचिन तेंडुलकरही सामना पाहण्यासाठी आले आहेत. यावेळी, सचिनने मराठी सांगितलं, कोण जिंकणार.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रसिद्ध गायकाच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे, गायक अरजितसिंगही लवकरच मैदानावर आला आहे. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी मैदानावर हजेरी लावण्याची शक्यता असून त्यात बॉलिवूड सिनेतारकांचाही समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसून आले. यावेळी, त्यांच्यासमवेत दिनेश कार्तिकही पाहायला मिळाला. या तिघांचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
प्रेक्षकांची मैदानाबाहेर गर्दी
दरम्यान, या हायव्होल्टेज सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा सामना पाहण्यासाठी गुजरातसह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक अहमदाबादेत पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी परदेशी प्रेक्षकही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आले आहेत. तर, सेलिब्रिटींचीही मांदियाळी मैदानावर दिसणार असून विराटपत्नी अनुष्का शर्मा, गायक अरजीत सिंग हेही अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. ब्लॉकबस्टर सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही प्रेक्षकांनी तर आरोग्य तपासणीच्या बहाण्याने अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे.
अनेक सेलिब्रिटींची हजेरी
अहमदाबादमध्ये होणारा हा शानदार सामना पाहण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तीही मैदानावर पोहोचणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, आधार पूनावाला यांचा समावेश आहे. या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमचे दरवाजे सकाळी 10 वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी उघडले जाणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मैदानात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १२.३० वाजता मैदानात १.३० लाख प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन परफॉर्म करणार आहेत.
७ हजार पोलीस तैनात
प्रेक्षकांच्या सोयीसाठी मैदानाजवळ १५ पार्किंग प्लॉट करण्यात आले आहेत. सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये धावणाऱ्या मेट्रो आणि बीआरटीएस सुविधांची फ्रीक्वेंसी वाढवण्यात आली आहे. या सर्व सुविधा रात्री दीड वाजेपर्यंत उपलब्ध असतील. अहमदाबाद पोलिसांनीही हाय व्होल्टेज सामन्यासाठी विशेष तयारी केली आहे. मैदानाच्या आत आणि बाहेर सुमारे ७,००० सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. एनएसजी आणि आरएएफसह केंद्रीय पोलीस दलही मैदानात तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातूनही विशेष पाळत ठेवली जाणार आहे.
Web Title: Sachin-Anushka Together; Ahmedabad ground for India-Pakistan match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.