Join us

तू खेळाप्रती सच्चा आहेस, सचिनने फोन करुन सूर्याला प्रोत्साहन दिलं

मात्र, तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सचिनने सूर्याला कॉल करुन त्याला प्रोत्साहन दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 11:49 IST

Open in App

मुंबई : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने सूर्यकुमार यादव निराश झाला होता. मात्र यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सूर्याला फोन करुन त्याला प्रोत्साहन दिले. सूर्यकुमारनेच याबाबत माहिती दिली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्याने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. 

मात्र, तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर सचिनने सूर्याला कॉल करुन त्याला प्रोत्साहन दिले. सचिनने सूर्यकुमारला संदेश दिला की, ‘जर तू खेळाप्रति प्रामाणिक आणि सच्चा आहेस, तर नक्कीच एकदिवस खेळही तुझा विचार करेल. कदाचित तुझ्या मार्गातला हा शेवटचा अडथळा असेल. भारतीय संघाकडून खेळण्याचे तुझे स्वप्न अजूनही एका कोपऱ्यात दडून आहे. लक्ष केंद्रित करुन स्वत:ला क्रिकेटच्या स्वाधीन कर. मला माहीत आहे की, तू निराश होऊन प्रयत्न सोडणाऱ्यांपैकी नाहीस. प्रयत्न करत रहा आणि आम्हाला तुझ्या दमदार खेळी पाहण्याचा, सेलिब्रेट करण्याचा आनंद देत रहा.’ यानंतर, ‘सचिन सरांच्या एका संदेशानेच माझ्या डोळ्यांसमोरचे सगळे चित्र स्पष्ट झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसचिन तेंडुलकर